धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासाच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून रक्तदान शिबिर

हे शिबिर राजाराम तरुण मंडळ, हनुमान मंदिर, सबजेल रोड येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. शिबिरासाठी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे आशीर्वाद आहेत.

विशाळगडाच्या संदर्भात कृती समिती देत असलेला लढा स्तुत्य असून हा विषय तडीस लागेपर्यंत तुमच्या पाठीशी राहू ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

सध्या देशात परखड लिखाण करणारे, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणारे, दैनिक ‘सनातन प्रभात’ हे एकमेव नियतकालिक आहे. मी बैठका, तसेच विविध कार्यक्रम यांमधून ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ आवर्जून वाचा’, असे नेहमी सांगतो.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पेणच्या माध्यमातून धर्मवीर बलीदान मासानिमित्त प्रतिदिन श्रीशिव-शंभू मानवंदना उपक्रम !

मानवंदना ११ मार्च ते ११ एप्रिलपर्यंत नियमितपणे देण्यात येणार आहे. पुढे पौर्णिमा आणि अमावास्या या दोन तिथींना असाच क्रम चालू असणार आहे, असे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.

छत्रपती संभाजी महाराज बलीदान मासानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ११६ जणांनी केले रक्तदान !

श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थानच्या सातारा विभागाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदान मासानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धारकर्‍यांकडून या रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद लाभला.

पेण येथील दुर्गप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे तहसीलदार अन् पोलीस प्रशासन यांना निवेदन

‘पेण येथील सांक्षी गडावर होत असलेल्या अतिक्रमणाविषयी लक्ष घालून त्यातही सहकार्य करावे’, अशी विनंती करण्यात आली.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट होणे आवश्यक ! – विवेक पंडित, कुडाळ

ज्याने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली, त्याच्या नावाने महाराष्ट्र राज्यात एक जिल्हा आहे, हे आपले मोठे दुर्दैव आहे.

३२ मण सुवर्ण सिंहासनाला खडा पहारा देण्यासाठी तरुणांनी पुढे यावे ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

बलीदान मास’ प्रत्येक घरात पाळला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे ३२ मण सुवर्ण सिंहासनासाठी नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून ४ सहस्र धारकर्‍यांची नोंदणी करा. – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

रायगडावरील ३२ मण सोन्याचे सिंहासन लवकर होण्यासाठी पू. भिडेगुरुजी यांचे शनीदेवाला साकडे !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा उजाळा म्हणून रायगडावरील ३२ मण सोन्याचे सिंहासन लवकर व्हावे, असे साकडे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी शनिशिंगणापूर येथे शनिदेवाला साकडे घातले.

दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कपिलेश्‍वर मंदिरासह बेळगाव जिल्ह्यातील १६ देवस्थानांवर प्रशासकांची नियुक्ती 

सरकार एकीकडे स्वतःच्या मालकीच्या आस्थापनांचे खासगीकरण करत असतांना मंदिरांचे सरकारीकरण करत आहे. भारताची राज्यघटना धर्मनिरपेक्ष असतांना मशीद, चर्च यांचे सरकारीकरण न करता केवळ हिंदु मंदिरांचे सरकारीकरण केले जात आहे !

निष्क्रीय पुरातत्व विभाग !

पुरातत्व खात्याचे जर थोडक्यात वर्णन करायचे झाल्यास ‘स्वत: काही न करणे, इतरांना काही करू न देणे आणि कुणी काही करत असेल, तर त्यात खोडा घालणे’, असे करता येईल.