आर्णी (जिल्हा यवतमाळ) येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यावर धर्मांधांचे प्राणघातक आक्रमण !

या आक्रमणाचा अर्थ या धर्मांधांचा लव्ह जिहाद आणि हत्या करणार्‍या तरुणाला पाठिंबा आहे, असाच होतो. त्यामुळे या धर्मांधांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

डिचोली येथे ‘धर्मवीर ज्वाले’चे आगमन !

धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलीदानमासाच्या निमित्ताने सतत ४० दिवस संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करणार्‍या ‘धर्मवीर ज्वाले’चे ७ एप्रिल या दिवशी डिचोली येथे आगमन झाले. ‘धर्मवीर ज्वाले’चे डिचोली ते सांखळी मार्गावरील नारायण झांट्ये महाविद्यालयाजवळ भव्य स्वागत करण्यात आले.

भगव्या ध्वजाचा आचारसंहितेशी संबंध काय ? – बापू ठाणगे,श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

नगर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये भगवे ध्वज काढण्याचे काम पोलीस प्रशासन आणि निवडणूक शाखेकडून चालू झाले आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख बापू ठाणगे यांनी ‘भगव्या ध्वजाचा आचारसंहितेशी काय संबंध ?’, असा प्रश्न करत जिल्हाधिकार्‍यांना यासंबंधी निवेदन दिले आहे.

कोल्हापूर येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने बलीदान मासाच्या निमित्ताने रक्तदान !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूर यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज बलीदान मासाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी ९८ जणांनी रक्तदान केले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीच्या वतीने रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद

उपक्रम करत असतांना सामाजिक कार्याचे भान ठेवून, आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेने रक्तदान शिबिर हाही उपक्रम घेतला जातो.

गोवा : अराजकता माजलेल्या बंगालमध्ये ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करा !

बंगालमध्ये हिंदु समाज जीव मुठीत धरून जगत आहे. बंगालमध्ये हिंदूंचे दमन रोखण्यासाठी पश्चिम बंगालचे राज्य सरकार तात्काळ विसर्जित करून तेथे ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करावी, अशी मागणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलनाच्या माध्यमातून केली.

सांगली येथील अनधिकृत पशूवधगृह महापालिकेने तात्काळ बंद करावे !

गोवंश हत्याबंदीचा कायदा असूनही गोवंशियांच्या रक्षणासांठी हिंदुत्वनिष्ठांना अजून किती वर्षे लढावे लागणार ?

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासाच्या पार्श्वभूमीवर धारकर्‍यांकडून सामूहिक मुंडण !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या या कालावधीत १ मास गोड पदार्थ न खाणे, १ वेळचे भोजन, तसेच आवडणारे पदार्थ व्यर्ज करतात.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे कोल्हापूर दौर्‍यावर आले असता ही भेट झाली. या प्रसंगी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, तसेच अन्य उपस्थित होते.

बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करून हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवावेत !

बंगाल येथे गेली अनेक वर्षे हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. संदेशखाली येथे हिंदु महिलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍या तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याला अटक केली आहे. याची दखल स्थानिक पोलिसांनी घेतलेली नाही.