
सातारा, २ फेब्रुवारी (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गडकोट मोहिमेसाठी कापडी फलक आणि भगवा ध्वज लावून येणार्या गाडीकडून आकारण्यात येऊ नये, अशी लेखी सूचना रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी पथकर नाका व्यवस्थापनाला दिली आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थाच्या वतीने पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षी गडकोट मोहीम आयोजित करण्यात येते. या वर्षी ७ ते ११ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये श्री उमरठे ते श्री रायगड अशी गडकोट मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी अखिल महाराष्ट्र आणि शेजारच्या राज्यांतूनही मोठ्या प्रमाणात शिवभक्त गडकोट मोहिमेसाठी येणार आहेत. मोहिमेच्या कालावधीमध्ये स्वखर्चाने धारकरी प्रवास करतात. टेम्पो, ट्रॅव्हल्स, ट्रक, चारचाकी यांमधून शिवभक्त मोहिमेमध्ये सहभागी होतात.