छत्रपती संभाजी महाराज बलीदान दिनानिमित्त श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानद्वारे मुंबई आणि ठाणे येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन !

नवी मुंबई येथील बालकांचा भ्रमणभाषमध्ये वेळ वाया घालवणारे ‘अ‍ॅप्स’ न ठेवण्याचा निर्णय !

हिदूंनो, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा आदर्श घ्या !

या श्‍लोकाप्रमाणे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्व शिवपाईक धारकरी दैनंदिन जीवनात जगतात, तसेच देव, देश आणि धर्म यांचे कार्य करतात. फाल्गुन शुक्ल पक्ष प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या हा कालावधी महाराष्ट्र्रातील प्रत्येक धारकरी, शिवपाईक हे धर्मवीर बलीदान मास म्हणून पाळतात.

सांगलीत व्यापारी, व्यावसायिक, राजकीय पक्ष यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

या मोर्च्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी, भाजप आमदार सुधीर गाडगीळ, मिरज येथील भाजप आमदार  सुरेश खाडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, ‘कॅट’चे उपाध्यक्ष अतुल शहा सहभागी झाले होते.

विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा !

या मागणीचे निवेदन विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने हुपरी येथील मुख्याधिकारी आणि पोलिसांच्या गोपनीय विभागाचे अधिकारी यांना ६ एप्रिल या दिवशी देण्यात आले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासाच्या निमित्ताने झालेल्या रक्तदान शिबिरात १०२ धारकर्‍यांचे रक्तदान !

शिबिरात रक्तदान केलेल्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा भेट

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावरील गुन्ह्याप्रकरणी मानवाधिकार आयोगाकडून पुण्याच्या पोलीस अधीक्षकांना समन्स !

फडणवीसांच्या वक्तव्याचा आधार घेत पू. भिडेगुरुजी यांच्या विरोधात केलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणावरून अधिवक्ता आदित्य मिश्रा यांनी मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली होती. यावरून महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाने पुणे पोलीस अधीक्षकांना समन्स बजावले आहेत.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासाच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून रक्तदान शिबिर

हे शिबिर राजाराम तरुण मंडळ, हनुमान मंदिर, सबजेल रोड येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. शिबिरासाठी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे आशीर्वाद आहेत.

विशाळगडाच्या संदर्भात कृती समिती देत असलेला लढा स्तुत्य असून हा विषय तडीस लागेपर्यंत तुमच्या पाठीशी राहू ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

सध्या देशात परखड लिखाण करणारे, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणारे, दैनिक ‘सनातन प्रभात’ हे एकमेव नियतकालिक आहे. मी बैठका, तसेच विविध कार्यक्रम यांमधून ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ आवर्जून वाचा’, असे नेहमी सांगतो.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पेणच्या माध्यमातून धर्मवीर बलीदान मासानिमित्त प्रतिदिन श्रीशिव-शंभू मानवंदना उपक्रम !

मानवंदना ११ मार्च ते ११ एप्रिलपर्यंत नियमितपणे देण्यात येणार आहे. पुढे पौर्णिमा आणि अमावास्या या दोन तिथींना असाच क्रम चालू असणार आहे, असे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.

छत्रपती संभाजी महाराज बलीदान मासानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ११६ जणांनी केले रक्तदान !

श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थानच्या सातारा विभागाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदान मासानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धारकर्‍यांकडून या रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद लाभला.