बांगलादेशी घुसखोर हद्दपारीसाठी पुणे येथे हिंदु संघटनांचा विराट मोर्चा !

ग्रामदैवत श्री कसबा गणपति मंदिरात आरती करून भव्य हिंदु जनसंघर्ष मोर्चाला प्रारंभ !

ग्रामदैवत श्री कसबा गणपति मंदिरात आरती करतांना श्री. रमेश शिंदे, श्री. विद्याधर नारगोलकर, श्री. सुनील घनवट

पुणे, १० फेब्रुवारी (वार्ता.) – पुणे येथे आयोजित भव्य हिंदु जनसंघर्ष मोर्च्याला ग्रामदैवत श्री कसबा गणपति मंदिरात आरती करून प्रारंभ झाला. मोर्चाची सांगता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाली. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी त्यांचे विचार व्यक्त केले, तसेच उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे घोषणा देत या विचारांना आपले अनुमोदन घोषित केले. तसेच पुढे येऊन कृती करण्याची सिद्धता दर्शवली. या वेळी सर्वांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता. सर्वत्र भगवे झेंडे आणि ‘बांगलादेशी घुसखोरांना पळवून लावा’ असे सांगणारे फलक यांमुळे हिंदुत्वनिष्ठांमध्ये एक वेगळाच जल्लोष निर्माण झाला होता. ‘सर्व संघटनांनी बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावा’, याविषयीचे निवेदन प्रस्तूत केले. जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने हे निवेदन पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी स्वीकारले.

पोलिसांकडून मोर्चाचे कौतुक !

मोर्चानंतर पोलिसांनी दिलेली उत्स्फूर्त प्रतिक्रिया !

तुमचा मोर्चा अतिशय चांगल्या पद्धतीने झाला. मोर्चातील प्रत्येक गोष्टच ‘प्रोफेशनल’ (व्यवसायिक पद्धत) होती. भाषणे चांगल्या प्रकारे झाली. बडबड, गोंधळ, दादागिरी काही नव्हते. सगळे पोलीस आनंदी होऊन गेले. इतर मोर्च्यांनंतर घरी गेल्यावर आमचे डोके दुखते. तुमच्या सगळ्या कृती आदर्श दिसून येत होत्या.


सांगता सभेतील वक्त्यांचे मार्गदर्शन !

१६ मे २०२५ हा दिवस बांगलादेशींना हद्दपार करण्यासाठी शेवटचा ठरला पाहिजे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

मार्गदर्शन करताना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री रमेश शिंदे

देशाची फाळणी झाली ती धर्माच्या आधारावर ! त्या वेळी ज्या बांगलादेशाला हिंदुस्थानने स्वातंत्र्य मिळवून दिले, तो बांगलादेश आज भुकेकंगाल झाला आहे आणि तेथील हिंदूंवर अत्याचार चालू आहेत. तेच बांगलादेशी आज आपल्या भारतात घुसखोरी करत आहेत. रत्नागिरीसारख्या ठिकाणी जन्माचे दाखले या बांगलादेशांना दिले गेले. डॉनल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी अमेरिकेमधून अनधिकृत लोकांना बाहेर काढणे चालू केले. त्याप्रमाणेच भारतातूनही सर्व बांगलादेशी घुसखोरांना बाहेर घालवले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या वेळी ‘१६ मे या दिवशी सर्व बांगलादेशींनी त्यांची बॅग बांधून सिद्ध रहावे’, असे सांगितले होते. आता अशा कोणत्या ‘१६ मे’ची वाट बघायला पाहिजे ? वर्ष २०२५ चा १६ मे हा दिनांक घुसखोर बांगलादेशींना हद्दपार करण्यासाठी शेवटचा ठरला पाहिजे.


शाहिस्तेखानाला हाकलणार्‍या छत्रपती शिवरायांप्रमाणे बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी करा ! – विद्याधर नारगोलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली,त्या ग्रामदैवत श्री कसबा गणपतिपासून जनसंघर्ष मोर्चाचा आरंभ केला आहे. येथील लाल महालामध्ये घुसलेल्या शाहिस्तेखानाला (परकियाला) छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटे छाटून हुसकावून लावले, तोच आदर्श ठेवून आपणही या बांगलादेशी घुसखोरांना हाकलून देण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला आहे. शरिरातील रोगाला काढून टाकण्यासाठी आपण प्रयत्न करतो, त्याप्रमाणेच हे बांगलादेशी भारतात घुसले आहेत, त्यांना काढून टाकण्यासाठी मोर्चा काढलेला आहे. बांगलादेशींना हाकलून देश वाचवा ! हिंदूंना वाचवा ! हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न करा !

आंबेगावचे माजी सरपंच संतोष गावडे भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी सौ. सीमा लिमये
भाजप पुणे महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे सहभागी धर्माभिमानी

 

राज्य सरकारने घुसखोरांची हकालपट्टी न केल्यास येणार्‍या काळात आंदोलन तीव्र होईल ! – सौ. उज्ज्वला गौड, रणरागिणी शाखा, भाजप

भाजप रणरागिणी शाखेच्या सौ. उज्वला गौड आणि भाजप पुणे महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे

भारतामध्ये अनेक बांगलादेशी घुसखोर हे विनापरवाना आणि बळजोरीने घुसलेले आहेत; पण आज हिंदु निद्रिस्त आहेत. घुसखोर देशाला अंतर्बाह्य पोखरून काढत आहेत; पण लोकांना याचे गांभीर्य नाही. पुण्यातील लोहियानगर, काशेवाडी आणि वस्ती भागामध्ये प्रत्येक घराच्या शेजारी बांगलादेशी घुसखोर आहेत. पडताळणी न करता ज्या घरमालकांनी या बांगलादेशी घुसखोरांना जागा दिली आहे, त्यांच्यावरही गुन्हे नोंद करावेत. महाराष्ट्र सरकारने या बांगलादेशी घुसखोरांना लवकर लवकरात शोधून बाहेर काढले नाही, तर हे आंदोलन येणार्‍या काळात अजून तीव्र असेल. प्रशासनाने हे काम न केल्यास आम्ही एकत्रितपणे अशा वस्त्यांमध्ये घुसून बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढू.

‘गुन्हेगारी वाढवण्याचे काम बांगलादेशी घुसखोर करत आहेत, अशा घुसखोरांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी’, असे मत भाजप पुणे महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे यांनी व्यक्त केले.

या वेळी ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, आंबेगावचे माजी सरपंच संतोष गावडे आणि भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी सौ. सीमा लिमये, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. सचिन घुले, हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री पराग गोखले यांनीही उपस्थितांना संबोधित केले.