शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर गुन्हा नोंदवावा !

  • पू. संभाजी भिडेगुरुजी यांना एकेरी, तर धारकर्‍यांना ‘हिंदु आतंकवादी’ संबोधल्याचे प्रकरण

  • नाशिक येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची गुन्हे विभागाच्या उपआयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी

नाशिक – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांना एकेरी संबोधून धारकरी हे ‘हिंदु आतंकवादी’ असल्याची आगपाखड करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करावा, यासाठी नाशिक येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी नाशिक जिल्हा गुन्हे विभागाचे उपआयुक्त प्रशांत जाधव यांना निवेदन दिले. (असे निवेदन का द्यावे लागते ? पोलीस प्रशासनाने स्वत:हून या प्रकरणी कारवाई करणे अपेक्षित ! – संपादक) श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती, बजरंग दल अशा संघटनांच्या कार्यकर्त्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

संपादकीय भूमिका

हिंदुत्वनिष्ठांना ‘आतंकवादी’ म्हणणार्‍यांवर पोलीस कारवाई करणार कि आंदोलनाची वाट पहाणार ?