पू. भिडेगुरुजी यांच्‍याविषयी अपशब्‍द उच्‍चारणारे विकास लवांडे यांच्‍यावर कायदेशीर कारवाई करा ! – तासगाव पोलीस ठाण्‍यात तक्रार

पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना निवेदन देतांना श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे धारकरी

तासगाव (जिल्‍हा सांगली) – श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्‍थापक असलेले पू. संभाजीराव भिडेगुरुजी गेली अनेक वर्षे तरुणांमध्‍ये राष्‍ट्र आणि धर्मप्रेम निर्माण होण्‍यासाठी कार्यरत आहेत. असे असतांना अशा ऋषितुल्य पू. भिडेगुरुजी यांच्याविषयी शरदचंद्र पवार राष्ट्‍रवादी काँग्रेस गटाचे प्रवक्ते विलास लवांडे यांनी ‘गडकोट किल्ल्‍यावर पू. भिडेगुरुजी हे हिंदु आतंकवादी सिद्ध करण्याचे काम करतात’, असे समस्त हिंदु समाज आणि धारकरी यांच्या भावना दुखावणारे वक्तव्‍य केले आहे. तरी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्याविषयी अपशब्द उच्‍चारणार्‍या विकास लवांडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्‍या वतीने १७ फेब्रुवारीला तासगाव पोलीस ठाण्यात द़ेण्यात आली. ही तक्रार पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी स्वीकारली. या प्रसंगी सर्वश्री सिद्धेश्वर लांब, आनंदराव धनवडे, रोहन पाटील, विलास पिसे, बाळू निकम, श्रीयुत आमले, विजय माळी यांसह अन्य उपस्‍थित होते.