IMD Forecasts Heatwave : पुढील ५ दिवस देहलीसह देशातील ९ राज्यांमध्ये उष्णतेची लाट येणार !

यांमध्ये देहली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, बिहार आणि बंगाल या राज्यांचा समावेश आहे. याखेरीज आसाम, त्रिपुरा, ओडिशा, झारखंड आणि गोवा या राज्यांतील उष्णतेत वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Kanhaiya Kumar Slapped By Man : देहलीतील काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार यांना एका व्यक्तीने श्रीमुखात लगावली !  

१७ मे या दिवशी संध्याकाळी येथील आम आदमी पक्षाच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर ही घटना घडली. या वेळी त्यांच्यावर शाईफेकही करण्यात आली, तसेच आम आदमी पक्षाच्या स्थानिक नगरसेविका छाया गौरव शर्मा यांच्याशीही जमावाने गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विदेशी दूतावासांत स्फोट घडवण्याचे षड्यंत्र रचणार्‍या फरार आतंकवाद्याला अटक !

चेन्नई येथील अमेरिकेचे दूतावास अन् बेंगळुरू येथील इस्रायलचे दूतावास येथे स्फोट घडवून आणण्याचे षड्यंत्र रचणार्‍या नुरुद्दीन उपाख्य रफी या आतंकवाद्याला ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणे’च्या (‘एन्.आय.ए.’च्या) अधिकार्‍यांनी म्हैसुरू येथे नुकतीच पुन्हा अटक केली.

चारधाममध्ये ३१ मेपर्यंत ‘व्हीआयपी’ दर्शन नाही !

चारधाम यात्रेसाठी केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री येथे भाविकांची होणारी प्रचंड गर्दी, हे प्रशासनासमोरील आव्हान बनले आहे. प्रचंड गर्दी लक्षात घेऊन उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतुरी यांनी अतीमहनीय व्यक्तींच्या (‘व्हीआयपी’च्या) दर्शनावरील बंदी ३१ मेपर्यंत वाढवली आहे.

बुलडोझर कुठे चालवायचा हे योगी आदित्यनाथ यांच्याकडून शिकावे !  

समाजवादी पक्ष आणि काँग्रेस केंद्रात सत्तेत आल्यास अयोध्येतील श्रीराममंदिरावर बुलडोझर चालवतील, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील प्रचारसभेत केला.

आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांना केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी गुन्हा नोंद

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीच स्वपक्षातील महिला खासदाराला मारहाण होते, हे आम आदमी पक्षाला लज्जास्पद ! पोलिसांनी सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी !

पाटलीपुत्र (बिहार) येथील शाळेच्या गटारात सापडला ४ वर्षांच्या मुलाचा मृतदेह

येथील टायनी टॉट अ‍ॅकॅडमी या शाळेच्या नाल्यामध्ये ४ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने संतप्त झालेल्या मुलाच्या नातेवाइकांनी संपूर्ण शाळाच पेटवून दिल्याची घटना १७ मे या दिवशी घडली.

काँग्रेसीकरणामुळे भारताची ५ दशके वाया गेली ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

भारतासमवेत स्वातंत्र्य झालेले कितीतरी देश पुढे गेले. भारतीय कुठेही अल्प नव्हते; मात्र काँग्रेसने भारतियांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला नाही. स्वातंत्र्यानंतर गांधीजींच्या सल्लानुसार काँग्रेस विसर्जित केली असती, तर भारत ५ पट पुढे गेला असता.

Assam Bangladeshi Infiltrators : आसाममध्ये बांगलादेशी घुसखोर हे आमदार, मंत्री, अध्यक्ष आणि न्यायदंडाधिकारी बनतात !

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची धक्कादायक माहिती !

Tuljabhavanidevi Temple Donation Scam : न्यायालयाने आदेश देऊनही तात्काळ गुन्हे न नोंदवल्यास प्रशासनाविरुद्ध अवमान याचिका प्रविष्ट करणार ! – हिंदूंची चेतावणी

. . . अशा महत्त्वाच्या मागण्या आम्ही शासनाकडे केल्या आहेत.’’ याउपरही प्रशासनाने कारवाई करण्यास विलंब केला, तर आम्हाला उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी अवमान याचिका प्रविष्ट करावी लागेल, अशी चेतावणीही अधिवक्ता (पू.) कुलकर्णी यांनी दिली.