Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमध्ये चकमकीत २२ नक्षलवादी ठार, तर एका सैनिकाला वीरमरण

रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि बिजापूर सीमेवर सुरक्षादल अन् नक्षलवादी यांच्यात २ ठिकाणी झालेल्या चकमकीत एकूण २२ नक्षलवादी ठार झाले, तर जिल्हा राखीव रक्षक दलाचा एक सैनिक वीरगतीला प्राप्त झाला. सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. दुसरीकडे नारायणपूर-दंतेवाडा सीमेवर झालेल्या बाँबस्फोटात २ सैनिक घायाळ झाले. छत्तीसगडमध्ये या वर्षी आतापर्यंत ७१ नक्षलवादी ठार झाले आहेत. गेल्या वर्षी अनुमाने ३०० नक्षलवादी ठार झाले होते. त्यांच्याकडून २९० शस्त्रेही जप्त करण्यात आली होती.

बिजापूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव म्हणाले की, चकमक अजूनही चालू आहे. चकमक संपल्यानंतरच संपूर्ण माहिती उपलब्ध होईल.

दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय म्हणाले की, हिरोली येथे चकमक चालू आहे.