आतापर्यंत ९२ मदरसे करण्यात आले बंद
उधमसिंह नगर (उत्तराखंड) – उत्तराखंडमधील भाजप सरकारने बेकायदेशीर मदरशांच्या विरोधात चालवलेल्या मोहिमेत आतापर्यंत राज्यभरात ९२ मदरशांना टाळे ठोकण्यात आले आहे. राजधानी डेहराडूनमध्ये ५२ मदरसे बंद करण्यात आले. नुकतेच उधमसिंह नगर जिल्ह्यातील जसपूर भागात ५, गदरपूरमध्ये ३ आणि रुद्रपूरमध्ये २ बेकायदेशीर मदरसे बंद करण्यात आले. पोलिसांनी राबवलेल्या पडताळणी मोहिमेत हे मदरसे बेकायदेशीर असल्याचे आढळले होते. यापूर्वी उधमसिंह नगरमधील खातिमा भागातही ९ मदरसे बंद करण्यात आले होते. सरकारी दाव्यांनुसार राज्यात अनुमाने ५०० बेकायदेशीर मदरसे असू शकतात. गेल्या १५ दिवसांत ५२ बेकायदेशीर मदरसे बंद करण्यात आले आहेत.
प्रशासनाच्या चालू असलेल्या या कारवाईचा मुसलमानांनी निषेध केला. त्यांचे म्हणणे आहे की, कोणतीही सूचना किंवा उत्तर न देता या मदरशांना अचानक टाळे ठोकले जात आहे, तेे योग्य नाही. या मदरशांमध्ये शिकणार्या सहस्रो मुलांचे भविष्य आता अंधारात जाऊ शकते. अनेक लोकांना वाटते की, रमझानच्या काळात मदरसे सील करणे अयोग्य आहे. तथापि, प्रशासनाचे म्हणणे आहे की, ही कारवाई पूर्णपणे कायद्याच्या कक्षेत आणि सरकारी आदेशांनुसार केली जात आहे.
संपादकीय भूमिका
|