कोटा (राजस्थान) येथे आमीर याने वैमनस्यातून हिंदु महिलेची केली हत्या

महिलेचा पुतण्याही घायाळ

प्रतिकात्मक छायाचित्र

कोटा (राजस्थान) – येथे सुमित्रा नावाच्या ४२ वर्षीय महिलेवर आणि तिच्या १७ वर्षीय पुतण्या अरविंद याच्यावर महंमद आमीर पठाण उपाख्य शिबू याने वैमनस्यातून चाकूने आक्रमण केले. यात सुमित्रा यांचा मृत्यू झाला आहे, तर पुतण्या अरविंद गंभीररित्या घायाळ झाला आहे. दोघेही १८ मार्चच्या रात्री झोपले असतांना आमीर चाकू घेऊन घरात घुसला आणि त्यांच्यावर चाकूचे वार केले. ही घटना भीमगंज मंडी परिसरातील हुसैनी नगरमध्ये घडली. पोलिसांनी आमीर याला अटक केली आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंसाठी पाकिस्तान आणि बांगलादेशच नाही, तर भारतही असुरक्षित झाला आहे. ही स्थिती आताच पालटली नाही, तर हिंदूंचे अस्तित्वच नष्ट होणार, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !