श्रीराममंदिराच्या मुख्य शिखरावर कळसाची झाली स्थापना !

स्थापित करण्यात आलेला कळस

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीराममंदिराच्या मुख्य शिखरावर १४ एप्रिल या दिवशी कळस स्थापित करण्यात आला. कळसाची प्रथम पूजा करण्यात आली. यानंतर वैदिक जप आणि हवन-पूजेसह ते मुख्य शिखरावर ठेवण्यात आले. येत्या जूनपर्यंत श्रीरामंमदिर पूर्णपणे बांधून सिद्ध होणार आहे.

श्रीराममंदिर

आता श्रीराममंदिराच्या संरक्षणासाठी ४ कि.मी. लांबीची भिंत बांधण्याचे काम चालू होणार आहे. ही भिंत दीड वर्षात सिद्ध होईल. तसेच १० एकर जागेत चपला आणि साहित्य ठेवण्यासाठी मांडणी बांधली जाणार आहे.