नगराध्यक्षांना बहुमताने पदच्युत करता येणार !

मुंबई – भ्रष्टाचार किंवा अन्य कोणते अपकृत्य केल्यास सदस्य बहुमताने नगराध्यक्षांना पदच्युत करू शकतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय १५ एप्रिल या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह अन्य मंत्री उपस्थित होते. नगराध्यक्षांना पदच्युत करण्यासाठी सदस्यांचे दोन तृतीयांश बहुमत किंवा एकमत असणे आवश्यक असणार आहे. यापूर्वी ५० टक्क्यांहून अधिक सदस्यांनी जिल्ह्याधिकार्‍यांकडे तक्रार केल्यास नगराध्यक्षांना पदच्युत करण्याविषयीचा निर्णय सरकारला घेता येत होता; मात्र हा अधिकार सरकारने पुन्हा नगरपालिका आणि नगर परिषद यांना दिला आहे.