‘पनवेल कनेक्ट’ ॲपचे लोकार्पण

पनवेल – येथील पनवेल महानगरपालिकेच्या ‘पनवेल कनेक्ट’ ॲपच्या माध्यमातून नागरिकांना ६३ ऑनलाइन विविध सेवा घरबसल्या मिळतील. या ॲपचे लोकार्पण भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दि.बा. पाटील विद्यालयात करण्यात आले. या ॲपच्या माध्यमातून नागरिक पालिकेच्या विविध सेवा, तक्रारी, कर भरणा, सरकारी योजना, स्थानिक बातम्या आणि नागरी समस्या यांविषयी माहिती आणि सुविधा मिळवू शकतात. महिलांच्या सुरक्षेसाठी ॲपमध्ये २४ घंटे आपत्ती व्यवस्थापन केंद्र उपलब्ध असेल. पोलीस, अग्निशमन आणि रुग्णवाहिका यांसारख्या सेवाही ॲपमधून मिळू शकतील.