पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर झालेल्या आक्रमणानंतर प्रशासनाला जाग !

सांगली, १५ एप्रिल (वार्ता.) – १४ एप्रिलच्या रात्री श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर एका भटक्या कुत्र्याने आक्रमण केले होते. या घटनेनंतर श्री शिवप्रतिष्ठानच्या धारकर्यांसह सर्व स्तरातून महापालिका प्रशासनावर टीका होऊ लागल्यावर महापालिका प्रशासन झोपेतून जागे झाले आहे. प्रशासनाच्या वतीने सांगली शहरातील सर्व भटकी कुत्री पकडण्याची मोहीम चालू करण्यात आली आहे. यापूर्वी ही मोहीम संथ गतीने चालू होती. शहरातील विविध गल्लीतील अनेक नागरिकांचा या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे; मात्र तरीही महापालिकेने याकडे कानाडोळा केला होता. भटक्या कुत्र्यांवर कोणतीच कारवाई झाली नव्हती; मात्र ही घटना घडल्यानंतर प्रशासन भटकी कुत्री पकडण्याची गती वाढवली आहे. शहरातून गल्ली बोळातून डॉग व्हॅन फिरत असल्याचे दिसत आहे. (टीका झाली नसती, तर मोहीम चालू केली नसती का ? – संपादक)
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात किरकोळ दुखापत !सांगली, १५ एप्रिल (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर १४ एप्रिलच्या रात्री एका भटक्या कुत्र्याने आक्रमण करून त्यांच्या पायाचा चावा घेतला होता. एका धारकर्याच्या घरातील कार्यक्रम आटोपून ते घरी जात असतांना माळी गल्ली येथे ही घटना घडली. या वेळी उपस्थितांनी पू. भिडेगुरुजी यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. ![]() पू. भिडेगुरुजी यांची प्रकृती पहाण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी महापालिकेच्या उपायुक्त सौ. स्मृती पाटील यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी भटक्या कुत्र्यांविषयी सध्या चालू असलेल्या उपाययोजनेविषयी माहिती देऊन याविषयी पू. भिडेगुरुजी यांचे मार्गदर्शन घेतले. या वेळी महापालिकेचे अन्य अधिकारीही उपस्थित होते. सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनीही पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची त्यांच्या घरी भेट देऊन प्रकृतीची विचारपूस केली. |
अफवांवर विश्वास ठेवू नका !पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची प्रकृती चांगली आहे. पू. भिडेगुरुजी नित्यक्रमाप्रमाणे कृती करत आहेत. तरी कृपया कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि निरर्थक चर्चा करू नये, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. |