
कोल्हापूर, १५ एप्रिल (वार्ता.) – ‘चिंतामणी सेवक फाऊंडेशन’चे श्री. सोहम कुराडे यांची बजरंग दलाच्या कोल्हापूर जिल्हा संयोजकपदी निवड करण्यात आली आहे. या संदर्भात श्री. सोहम कुराडे म्हणाले, ‘‘गेली ४ वर्षे चिंतामणी सेवक फाऊंडेशनच्या माध्यमातून कार्यरत आहे. यापुढील काळात हिंदु धर्म, संस्कृती या संदर्भातील कार्य वाढवणे यांसाठी प्रयत्न करू, तसेच बजरंग दलाची शाखा वाढवणे, बजरंग दलाचे कार्य वाढवणे, युवकांचे संघटन यांसाठी प्रयत्नरत राहू.’’