नगर (पुणे) रस्त्यावरील बी.आर्.टी. मार्गास प्रारंभ

पुणे – नगर रस्त्यावरील बी.आर्.टी.मार्ग हटवण्याचे काम करतांना पुणे महानगरपालिका 

पुणे – नगर रस्त्यावरील अनेक महिन्यांपासून ‘जलद बस मार्ग’ (बी.आर्.टी.) अर्धवट अवस्थेत असल्याने वाहतूककोंडी निर्माण होत होती. हा मार्ग काढण्यास महापालिकेने हालचाली चालू केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊन तातडीने हा मार्ग काढण्यास सांगितला होता.

नगर रस्त्यावरील काही भागांतील बी.आर्.टी. मार्ग काढून टाकला होता. सोमनाथनगर ते खराडी जुना जकात नाक्यादरम्यानची बी.आर्.टी. मार्ग काढण्यात आला नव्हता. त्यामुळे वाहतूककोंडी होत होती. त्यातून अपघातांचे प्रमाण वाढले होते. अर्धवट स्थितीतील हा मार्ग काढण्याची मागणी राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. टिंगरे यांनी सांगितले की, हा ३ कि.मी.चा मार्ग आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारा मार्ग आणि बस स्थानके हटवण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. हा मार्ग काढल्यानंतर पुढच्या टप्प्यातील उर्वरित मार्ग काढण्यात येणार आहे.