
बीड – जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव ग्रामपंचायतीचे भाजपचे सदस्य बाबासाहेब आगे यांची आरोपी नारायण फपाळ याने धारदार कोयत्याने वार करून हत्या केली. ही घटना १५ एप्रिल या दिवशी माजलगाव येथील भाजप कार्यालयासमोर घडली. या संबंधीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. हत्येनंतर आरोपीने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. पोलिसांनीत्याला अटक केली आहे.
बाबासाहेब आगे हे सदस्यासमवेत भाजपचे विस्तारक म्हणून काम करत होते. ते भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळील भाजप कार्यालयात आले होते. त्या वेळी मारेकरी नारायण फपाळ याने सदर्यातून लपवलेल्या कोयत्याने त्यांच्यावर वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळी पडून होता. हे हत्याकांड पैशांच्या देवाणघेवाणीतून घडल्याचा संशय व्यक्त होत आहे.
संपादकीय भूमिकाबीडची बिहारच्या दिशेने वाटचाल चालू ! |