राज्यातील २० ‘आयटीआय’मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रीमंडळाची बैठक

मुंबई – राज्यातील २० आयटीआयमध्ये (औद्योगिक प्रशिक्षिण संस्था) अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणे, उद्योजक मेळावे आयोजित करून रोजगार निर्मिती करणे यांसाठी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने श्री श्री ग्रामीण विकास कार्यक्रम ट्रस्ट बेंगलोर, स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाऊंडेशन बेंगळूरू, पुणे येथील देआसरा फाऊंडेशन, अंधेरी येथील प्रोजेक्ट मुंबई या सामाजिक संस्थांशी करार केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १५ एप्रिल या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर हे सामंजस्य करार करण्यात आले आहेत.