Kerala HC Slams Temple Board : हा मंदिराचा उत्सव आहे कि महाविद्यालयाचा ?

‘तुम्ही मंचावर कोणत्या प्रकारची सजावट केली आहे ? हा महाविद्यालयातील उत्सव आहे का ? हे करण्यासाठी तुम्ही भक्तांकडून पैसे घेतले आहेत का ? हा मंदिराचा उत्सव आहे. मंदिरात चित्रपटगीते नव्हे, तर भक्तीगीते लावायला हवी होती, अशा शब्दांत न्यायालयाने मंडळाला फटकारले.

Prakash Ambedkar : (म्हणे) ‘औरंगजेबाची कबर म्हणजे दुसरी अयोध्या होण्याची शक्यता !’

औरंगजेबाच्या कबरीचा संबंध अयोध्येशी जोडणे, हा हिंदुद्वेष नव्हे का ?

Nagpur StonePelting On Ambulance : नागपूर दंगलीत घायाळ झालेल्या पोलिसांना नेणार्‍या रुग्णवाहिकेवर दगडफेक !

ही घटना पहाता नागपूर येथील दंगल अद्याप शमलेली नाही, हे दिसून येते ! आक्रमणकर्ते पोलिसांवर आक्रमण करण्यासाठी टपूनच बसलेले आहेत. अशा प्रकारे मोकाट फिरणार्‍या दगडफेक्यांवर कारवाई कधी होणार ?  

Karad Krishnamai Mandir Theft : कराडचे ग्रामदैवत कृष्णामाई मंदिरात चोरी

कृष्णामाई मंदिरात वारंवार चोरी होत असूनही येथे सीसीटीव्ही कॅमेरे का बसवले गेले नाहीत ? यातून प्रशासनाला हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण व्हावे, असे वाटत नाही, असे हिंदूंनी समजायचे का ?

Dihuli Murder Case : उत्तरप्रदेशातील दिहुली हत्याकांड प्रकरणी ४३ वर्षांनंतर निकाल – ३ आरोपींना फाशीची शिक्षा !

उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच ! सत्र न्यायालयाला निकाल द्यायला २ पिढ्या गेल्या. आता तो खटला जर पुढे सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला, तर किती पिढ्यांनी न्याय मिळेल, असा प्रश्‍न सामान्य जनतेला पडला आहे.

Pro-Khalistan Poster Row : पंजाबमध्ये हिमाचल प्रदेशाच्या परिवहन विभागाच्या बसवर खलिस्तानींचे आक्रमण

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार असल्यापासून खलिस्तानींविषयी बोटचेपे धोरण राबवले जात आहे. हे लक्षात घेता देशाच्या सुरक्षेवरून पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लावणे आवश्यक झाले आहे !

Nepal Royalist Movement : नेपाळमधील राजेशाहीच्या समर्थनार्थ चाललेल्या चळवळीत भारताची कोणतीही भूमिका नाही ! – डॉ. एस्. जयशंकर

नेपाळच्या परराष्ट्रमंत्री आरजू राणा देऊबा भारत दौर्‍यावर आल्या आहेत. यात नेपाळमधील राजेशाहीच्या समर्थनार्थ होत असलेल्या निदर्शनांवरही चर्चा झाली.

एकमेवाद्वितीय हिंदु धर्मच मानवजातीचा तारणहार !

‘मानवाचा जन्म का झाला ? जन्मापूर्वी तो कुठे होता ? मृत्यूनंतर तो कुठे जातो ? इत्यादी विषयांची थोडीफारही माहिती नसणारे पाश्‍चात्त्य आणि साम्यवादी मानवजातीचे प्रश्‍न कधी सोडवू शकतील का ? या सर्व प्रश्‍नांची उत्तरेच नव्हे, तर त्यांतील अशुभ कसे टाळायचे, हे ज्ञात असलेला एकमेव हिंदु धर्मच मानवजातीचा तारणहार आहे !’