Prakash Ambedkar : (म्हणे) ‘औरंगजेबाची कबर म्हणजे दुसरी अयोध्या होण्याची शक्यता !’

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर

मुंबई – नागपूर हिंसाचारानंतर दोन्ही बाजूंच्या लोकांवर, तसेच खोटी अफवा परवणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे. टाळी एका हाताने वाजत नाही. तिला दोन हात लागतात. अप्रिय गोष्ट असली, तरी मुख्यमंत्र्यांनी ती करावी, म्हणजे वर्ष १९९२ मध्ये उत्तरप्रदेशमध्ये जे घडले, तसे महाराष्ट्रात घडू नये. इतकी दक्षता मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, अन्यथा राज्याच्या बाहेरचे लोक औरंगजेबाची कबर हे राष्ट्रीय सूत्र करू पहात आहेत.

अयोध्येचा आता राजकीय लाभ नाही; पण औरंगजेबाची कबर, हा राजकीय लाभ आहे. त्यामुळे ही दुसरी अयोध्या होण्याची शक्यता आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

संपादकीय भूमिका

औरंगजेबाच्या कबरीचा संबंध अयोध्येशी जोडणे, हा हिंदुद्वेष नव्हे का ?