Nagpur StonePelting On Ambulance : नागपूर दंगलीत घायाळ झालेल्या पोलिसांना नेणार्‍या रुग्णवाहिकेवर दगडफेक !

रुग्णवाहिकेच्या काचा फुटल्या

वर्तुळात पोलीस उपायुक्त निकेतन कदम

नागपूर – महाल परिसरातील दंगलीत घायाळ झालेले पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यासह इतरही घायाळांना आरंभी मेयो रुग्णालयात हलवण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर तिघांना दुसर्‍या रुग्णालयात हलवण्यात येणार होते. त्यांपैकी कदम यांना घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेवर दगडफेक करण्यात आली; पण रुग्णवाहिकेच्या चालकाने प्रसंगावधान राखत वाहन चालवल्याने कदम वाचले. या दगडफेकीत रुग्णवाहिकेच्या काचा फुटल्या.

संपादकीय भूमिका

  • ही घटना पहाता नागपूर येथील दंगल अद्याप शमलेली नाही, हे दिसून येते ! आक्रमणकर्ते पोलिसांवर आक्रमण करण्यासाठी टपूनच बसलेले आहेत. अशा प्रकारे मोकाट फिरणार्‍या दगडफेक्यांवर कारवाई कधी होणार ?  
  • नागपूरमधील वाढते अराजक रोखण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत !