द्रव्य घेऊन कथा आणि प्रवचन करणे – आध्यात्मिक क्षेत्रातील अपप्रकार !

काही प्रसिद्ध प्रवचनकार, कीर्तनकार, संत, गुरु, ज्यांच्या प्रवचनांना लोकांचा पुष्कळ प्रतिसाद लाभत आहे, तसेच ज्यांना पुष्कळ प्रसिद्धी मिळत आहे, ते प्रवचन करण्यासाठी पुष्कळ पैशांची मागणी करत आहेत. ‘हे अयोग्य आहे’, असे कुणाच्या लक्षातही येत नाही. ‘याचे प्रवचनकार, कीर्तनकार, संत किंवा गुरु, तसेच समाजमन यांवर काय परिणाम होतात ?’, ते पाहूया.

गुरुकृपेने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ करत असलेल्या सेवांची व्याप्ती

मागील लेखात आपण ‘विविधांगी सेवा मिळण्याची मुख्य कारणे माझ्यातील ‘जिज्ञासा’ हा गुण आणि प्रामुख्याने ‘गुरुकृपा’ ही आहेत’, असे वाटणे, आध्यात्मिक त्रासांवर नामजपादी उपाय सांगणे अन् दुसर्‍यांसाठी नामजपादी उपाय करणे’, यांविषयीचे लिखाण वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.                  

आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून धर्मप्रसार करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा !

धर्माच्या अधिष्ठानावरच ‘हिंदु राष्ट्र’ उभे रहाणार असल्याने हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी सर्वत्र धर्मप्रसाराचे कार्य होणे नितांत आवश्यक आहे. धर्मप्रसाराचे कार्य होण्यामध्ये ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती यांपैकी ज्ञानशक्तीचे योगदान सर्वाधिक आहे.

अखंड कृतज्ञ राहूनी घडो तव (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) चरणसेवा ।

‘एकदा मी ‘निर्गुण’ हा नामजप करत असतांना श्री गुरूंच्या कृपेने भावस्थिती अनुभवली आणि त्यांनीच ही कविता लिहूनही घेतली’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी ५० लाख रुपयांचा सोन्याचा सिंह अर्पण !

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी एका भाविकाने ७१ तोळे १०० ग्रॅम वजनाचा अंदाजे रक्कम ५० लाख ३३ सहस्र १६८ रुपये मूल्याचा सोन्याचा सिंह अर्पण केला.