महाराष्ट्रात ‘शक्ती कायदा’ लागू करावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलन !

महाराष्ट्रात शक्ती कायदा लागू करण्यात यावा, यासाठी ३ सप्टेंबर या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मंत्रालयाजवळील गांधीजींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.

सुतारवाडी (पुणे) येथील कब्रस्‍तानातील अवैध बांधकामावर महापालिकेची कारवाई !

अवैध मशीद बांधण्‍यात येईपर्यंत महापालिका झोपली होती का ? अशा अवैध मशिदींवर कारवाई होण्‍यासाठी लोकांना लढा का द्यावा लागतो ?

उंचगाव येथील राज्य महामार्गाच्या पुलाखाली पडलेल्या खड्ड्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निषेध !

सातारा ते कागल हे सहापदरीकरण करण्याचे काम अत्यंत संथगतीने चालू आहे. या मार्गावर मोठे खड्डे पडले असून येथे अनेकांचे अपघात झाले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून शिवसेनेला डावलून समित्यांच्या नियुक्त्या !

कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीच्या प्रमुख निर्णयात शिवसेनेला डावलले जाते.

Sardar Akhtar Mengal of Pakistan : बलुचिस्तान प्रांत पाकच्या हातातून गेला आहे !

पूर्व बंगालचा बांगलादेश करण्यात भारताने साहाय्य केले, तसे आता बलुचिस्तानसाठी भारताने पावले उचलावीत, असे अनेक बलुची नेत्यांना वाटते !

पुष्कळ संवेदनशील सूत्र असल्याने यावर कुणीही विश्वास ठेवू नये ! – महापालिका आयुक्त

पिंपरी-चिंचवड येथे छत्रपती संभाजी महाराजांचा १०० फुटी पुतळा उभारला जात आहे; मात्र पुतळा उभारण्यापूर्वी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाला तडा गेला.

CM Siddaramaiah : अजानचा आवाज ऐकून कर्नाटकच्या काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाषण थांबवले !

ज्या मशिदीवरून अजानचा आवाज येत होता, तो किती डेसिबल होता ?, याची पडताळणीचा आदेश सिद्धरामय्या यांनी का दिला नाही ? त्या मशिदीवर भोंगा लावण्याची अनुमती घेतली होती का ?, याचीही चौकशी केली पाहिजे !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा नोंद !

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नवीन गुन्हा नोंद केला आहे.

एस्.टी.च्या संपामुळे सुमारे १५ कोटी रुपयांचा महसूल बुडला !

४ सप्टेंबरलाही राज्यभर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कोकणातील बसगाड्यांची वाहतूक रखडल्याने प्रवासी राज्य परिवहन महामंडळाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करीत आहेत. संपामुळे एस्.टी.चा १५ कोटी रुपयांचा महसूल बुडला आहे.

नागपूर येथील विमानतळावर ६१ लाख रुपयांचे सोने जप्त !

नागपूर येथील कस्टम्सच्या ‘एअर कस्टम्स युनिट’ आणि ‘एअर इंटेलिजन्स युनिट’च्या पथकाने संशयित प्रवाशांची पडताळणी केली असता २ ट्रॉली बॅगांमध्ये सोने आणि चांदी जाड तारांच्या स्वरूपात लपवून ठेवलेले आढळून आले.