Iran’s Fath-360 ballistic missile : इराणने रशियाला पुरवले ‘फतेह-३६०’ क्षेपणास्‍त्रे !

तेहरान – रशिया आणि युक्रेन यांच्‍यातील तणाव वाढतच चालला आहे. त्‍याचा परिणाम इतर देशांवरही दिसून येत आहे. इराणने आता रशियाला ‘फतेह-३६०’ नावाची बॅलेस्‍टिक क्षेपणास्‍त्रे पुरवली आहेत. रशिया ही क्षेपणास्‍त्र युक्रेनविरुद्ध वापरेल, अशी शक्‍यता व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे. इराण आणि रशिया यांच्‍या पुढील हालचाली टाळण्‍यासाठी रशियावर आंतरराष्‍ट्रीय दबाव आणण्‍याचे आवाहन युक्रेनने केले आहे.

रशियन सैनिकांनी इराणमध्‍ये ‘फतेह-३६०’  क्षेपणास्‍त्रे चालवण्‍याचे प्रशिक्षण घेतल्‍याच्‍या वृत्तामुळे चिंता आणखी वाढली आहे. हे क्षेपणास्‍त्र त्‍याच्‍या अचूक आणि जलद मार्‍यासाठी ओळखले जाते. ‘फतेह-३६०’ हे क्षेपणास्‍त्र सैन्‍यदलाचे तळ आणि पायाभूत सुविधा यांना लक्ष्य करण्‍यासाठी सिद्ध करण्‍यात आले आहे.