Ayushman Bharat : ७० वर्षे वयाच्‍या पुढील वृद्धांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत विनामूल्‍य उपचार !

या योजनेचा लाभ देशातील ६ कोटी ज्‍येष्‍ठ नागरिकांना होणार आहे. यामध्‍ये देशातील अनुमाने ४ कोटी ५० लाख कुटुंबांचा समावेश असेल. भाजपने लोकसभेच्‍या निवडणुकीच्‍या घोषणापत्रात हे आश्‍वासन दिले होते.

‘राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघा’च्या वतीने घरातील श्री गणेश आणि श्री महालक्ष्मी यांच्या सजावटीविषयी स्पर्धा !

राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या अहिल्यानगर शहर शाखेच्या वतीने शहरातील गणेशभक्तांसाठी घरातील श्री गणेशमूर्ती आणि श्री महालक्ष्मी यांच्या समोर केलेल्या सजावटीविषयी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे शहराध्यक्ष श्री. महेश गुगळे यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर येथे पहिले सामूहिक अथर्वशीर्ष पठण !

विद्येची देवता मानल्या गेलेल्या श्री गणेशाची आराधना करण्यासाठी श्री संस्थान गणपति आणि दैनिक ‘दिव्य मराठी’ यांच्या वतीने महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण आयोजित करण्यात आले होते. या वेळी ३५ संस्था-संघटनांच्या महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.

सातारा येथील अस्वच्छ ऐतिहासिक मोती तळे !

स्वच्छतेविषयी आणि जनतेच्या आरोग्याविषयी असंवेदनशील असणारे सातारा प्रशासन ! ऐतिहासिक तळे अस्वच्छ असेल, तर शहरात अन्य ठिकाणी स्वच्छता कशी असेल ? याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन मोती तळे आणि शहरातील अन्य ठिकाणची स्वच्छता लवकरात लवकर करावी, ही अपेक्षा !

महापालिका उपायुक्तांच्या खात्यांमध्ये पालट !

प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी उपायुक्तांच्या खात्यांमध्ये पुढील काही  पालट केले आहेत.

जिल्ह्यात ११२ हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेतली ! – विश्वजीत भोसले, वीज वितरण आस्थापन

गणेशोत्सव मंडळांनी त्यांचे देखावे करतांना, तसेच अन्य विद्युत् रोषणाईसाठी वीज वितरण आस्थापनाकडून अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले होते. अशी वीजजोडणी ही भाविकांसाठी सुरक्षित आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ११२ हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेतली आहे.

विज्ञानाचा लाभ !

‘विज्ञानाचा एक लाभ म्हणजे विज्ञानानेच विज्ञानाचे विश्लेषण खोडता येते आणि त्यामुळे बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे तोंड बंद करता येते !’

लक्ष्मणपुरी कि लाहोर ?

उत्तरप्रदेशची राजधानी लक्ष्मणपुरी येथे धर्मांध मुसलमानांनी ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत एका गणेश मंडपावर दगडफेक केली. या वेळी हिंदूंना ‘पूजा बंद करा, अन्यथा वाईट परिणाम होतील’, अशी धमकीही देण्यात आली.