माकपचे नेते सीताराम येचुरी यांचे निधन

मार्क्‍सवादी कम्‍युनिस्‍ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी

नवी देहली – मार्क्‍सवादी कम्‍युनिस्‍ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी (वय ७२ वर्षे) यांचे देहलीतील एम्‍स रुग्‍णालयात निधन झाले. श्‍वसनमार्गात जंतूसंसर्ग झाल्‍यामुळे त्‍यांना काही दिवसांपूर्वी उपचारांसाठी एम्‍स रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले होते. तेथे त्‍यांच्‍यावर उपचार चालू होते. गेल्‍या दोन दिवसांपासून त्‍यांची प्रकृती खालावली होती.