पुणे येथील २ गणेशोत्सव मंडळांवर पोलिसांकडून गुन्हे नोंद !

श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये उच्च क्षमतेच्या ध्वनीक्षेपकांचा वापर केल्याप्रकरणी २ मंडळांवर सहकार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरातील ‘अखिल गुरुदत्त तरुण मित्र मंडळ’ आणि ‘शिवतीर्थ मंडळ’ या २ मंडळांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील पूररेषेच्या आतील अनधिकृत बांधकामांना नोटीसा !

अनधिकृत बांधकामे होईपर्यंत प्रशासनातील अधिकारी झोपा काढत होते का ?  या बांधकामांना उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे.

पुणे येथील श्री चतु:श्रृंगी मंदिर २९ सप्टेंबरपासून भाविकांसाठी खुले !

येथील श्री चतु:श्रृंगी मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी पूर्ण करण्यात येत आहे. ३ ऑक्टोबर या दिवशी नवरात्र उत्सवाची घटस्थापना होत आहे. त्यापूर्वी २९ सप्टेंबरपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येत आहे, अशी माहिती ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाचे कार्यकारी विश्वस्त श्रीकांत अनगळ यांनी दिली आहे.

बुद्धीप्रामाण्यवाद्यांमुळे अध्यात्मातील विविध अंगांना मुकणारे हिंदू !

पूर्वीच्या काळी ‘बुद्धीला पटते, तेच खरे’, अशा वृत्तीचा समाज आणि अधिवक्ता इत्यादी नसल्याने ‘मारुति एका उड्डाणात श्रीलंकेला पोचला’, अशासारख्या रामायणातील, तसेच महाभारतातील आणि विविध पुराणांतील ऐतिहासिक कथा, त्याचप्रमाणे ‘ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले’ इत्यादी इतिहास सांगणार्‍यांना शिक्षा केली गेली नाही. आता ‘बुद्धीपलीकडील काही अनुभवले, तर ते छापू नका’, असा अधिवक्त्यांचा सल्ला सर्वांना असतो ! त्यामुळे मानवाला फार मोठ्या घटना आणि त्यांचे शास्त्र यांपासून वंचित रहावे लागत आहे. हिंदुराष्ट्रात बुद्धीपलीकडील सांगणार्‍यांचा गौरव केला जाईल.’

बांगलादेशातील असाहाय्य हिंदू !

बांगलादेशातील खुलना येथे धर्मांध मुसलमानांनी ‘दुर्गापूजा करायची असेल, तर ५ लाख टका (अनुमाने साडेतीन लाख रुपये) द्यावे लागतील’, अशी धमकी हिंदूंना दिली आहे. पैसे दिले नाहीत, तर ठार करण्याचीही धमकीही देण्यात आली आहे.

लोहगाव (पुणे) येथे ‘गायत्री परिवारा’च्या वतीने महिलांसाठी ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’ या कार्यक्रमाचे आयोजन !

मुलींना धर्मशिक्षण मिळाले नसल्याने त्या अन्य धर्मियांच्या कचाट्यात सापडतात. महिलांनी स्वतःच्या रक्षणासाठी व्यायामाचे प्रकार करून सिद्ध व्हायचे आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर यांनी व्यक्त केले.

संपादकीय : पाकच्या चित्रपटांवर बहिष्कार हवाच !

पाकिस्तान भारतातील चित्रपटांवर बंदी घालत असतांना भारताने पाकच्या चित्रपटांना पायघड्या घालणे, ही स्वाभिमानशून्यता !

कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांना सांभाळा !

नगर परिषदेत मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप असल्याने ‘प्रशासक’ म्हणून काम करणार्‍या अधिकार्‍यांचा कारभार नकोसा झाल्याचे चित्र यवतमाळ नगर परिषदेत सध्या दिसत आहे…

स्वार्थासाठी आणि दुसर्‍यांना खुश ठेवण्यासाठी विवेकबुद्धीचा वापर न करण्याची प्रवृत्ती म्हणजे ज्ञानेश महाराव !

स्वतःच्या आत्म्याला मारून, सत्याचा गळा घोटून, स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी आणि दुसर्‍यांना खुश ठेवण्यासाठी विवेकबुद्धीचा वापर न करण्याची प्रवृत्ती, स्वार्थी मन अन् बुद्धी यांवर बांधलेली पट्टी, स्वतःहून चढवून घेतलेले आवरण, अशी महाराव यांची स्थिती आहे…