थोडक्यात महत्त्वाचे : हार्बर रेल्वे विस्कळीत ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड….आज गायमुख येथील चौपाटीच्या दुसर्‍या टप्प्याचे लोकार्पण !

वाशी रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हार्बर रेल्वे सेवेवर परिणाम झाला. हार्बर रेल्वेवरील वाहतूक २० ते २५ मिनिटे विलंबाने धावत होती.

हिंदु धर्माच्या रक्षणासाठी वज्रमूठ बांधून संघर्षासाठी सिद्ध व्हा ! – ह.भ.प. संग्रामबापू भंडारे पाटील

हिंदु समाजावर आक्रमणे होत असतील, तर तरुणांनो, गुटखा खाऊन तोंड लाल करण्यापेक्षा कपाळाला टिळा लावून ते लाल करा. धर्माचा अभिमान जागा झाला पाहिजे. टोपी घातलेले, टिळा लावलेले यांना ‘जय श्रीराम’ म्हणा.

गणेशोत्सव काळात इचलकरंजी (कोल्हापूर) शहरात मांसाहार विक्री बंद करा ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन

राज्यात गणेशोत्सव हा सण अतिशय आनंदात आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तरी या उत्सवाचे पावित्र्य राखण्यासाठी निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने प्रांताधिकार्‍यांना देण्यात आले.

पुणे येथे गोरक्षण करतांना कसायांना साहाय्य करणार्‍याविरुद्ध तक्रार !

गोरक्षणाच्या कार्यात कसायांशी हातमिळवणी करणार्‍या अशा फसव्या गोरक्षकांना आजन्म कारावासात डांबायला हवे !

जत येथील रखडलेल्या कामाच्या निषेधार्थ सत्यनारायण महापूजा !

रस्त्याची कामे होण्यासाठी असे सोहळे राबवण्याची वेळ येणे दुर्दैवी ! प्रशासन स्वतःहून त्यांचे काम का करत नाही ?

गणेशोत्सवात प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘श्री गणेशमूर्तीदान’ या संकल्पना राबवू नयेत !

या प्रसंगी महापालिका प्रशासनाने प्रशासन पंचगंगा नदीवर बॅरिकेड्स लावून मूर्तीविसर्जन करण्यास बंदी न करता ज्या भाविकांना पंचगंगा नदीत विसर्जन करावयाचे आहे, त्यांना ते करू देण्यात यावे

श्री तुळजाभवानी मंदिर आणि परिसर यांच्या विकासासाठी ५४ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता !

जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांच्या पुढाकाराने मंदिर परिसरातील ही विकासकामे अन् आराखडा संमत करण्यात आला आहे.

आमदार वैभव नाईक यांची शिल्पकार, सल्लागार यांसह राज्याच्या मुख्य सचिवांनाही नोटीस !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निर्मिती आणि उभारणी प्रक्रियेतील त्रुटींवर या नोटीसीद्वारे बोट ठेवण्यात आले आहे.

जे.एन्.पी.ए. बंदर परिसरात विविध पक्ष्यांचा संचार वाढला !

समुद्र आणि निसर्गसंपन्न विभागात असलेल्या जे.एन्.पी.ए. बंदर परिसरातील आधुनिक इको तंत्रज्ञानाचा वापर करीत येथील पाचही जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे.

पाच्छापूर (भिवंडी) येथील तरुणांकडून अल्पवयीन मुलाची भ्रमणभाषसाठी हत्या !

हा मुलगा शहापूर तालुक्यातील एका आश्रमशाळेत ९ वीत होता. काही महिन्यापूर्वीच त्याच्या आईने त्याला १५ सहस्र रुपयांचा भ्रमणभाष घेऊन दिला होता.