दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : सांगवी (पिंपरी) येथे कोयत्याने तिघांवर वार ! ,पुणे येथे चिमुकल्यावर कुत्र्यांचे आक्रमण !..

येथील सांगवीमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या दरम्यान कोयत्याने तिघांवर वार केला आहे. पूर्ववैमनस्त्यातून खून करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे.

सातारा येथे विसर्जन मिरवणुकीत प्लाझमा, बीम आणि लेझर लाईट यांना प्रतिबंध !

श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या आणि मिरवणूक पहाण्यास आलेल्या भक्तांच्या डोळ्याला इजा होऊन त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हे आदेश दिले आहेत.

आरक्षणाविषयीच्या वक्तव्याच्या विरोधात शिवसेनेकडून राहुल गांधीच्या चित्राला ‘जोडे मारा’ आंदोलन !

या प्रसंगी जिल्हाप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात गुन्हा नोंद करा !

संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमामध्ये हिंदु देवता आणि संत यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने करणार्‍या हिंदुद्रोही ज्ञानेश महाराव यांच्यावर त्वरित गुन्हा नोंद करावा…

CM Yogi On Gyanvapi : ज्ञानवापीला ‘मशीद’ म्‍हणणे दुर्दैवी ! – मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ

विधीमंडळानेही ज्ञानवापीला आदि विश्‍वेश्‍वर काशी विश्‍वनाथाचे मूळ स्‍थान म्‍हणून मान्‍यता दिली आहे. कल्‍याण सिंह यांच्‍यानंतर असे रोखठोक वक्‍तव्‍य ऐकणे दुर्लभ झाले होते !

ऑगस्टमध्ये एस्.टी. महामंडळ प्रथमच १६.८६ कोटी रुपयाने लाभात !

गेली ५ ते ६ वर्षे अनेक आर्थिक संकटांचा सामना करणारे एस्.टी. महामंडळ ९ वर्षांनी, ऑगस्ट-२०२४ मध्ये एस्.टी. महामंडळ लाभात आहे.

ज्ञानेश महाराव यांना अटक करण्याची बजरंग दलाची मागणी

ज्ञानेश महाराव यांना कठोर शिक्षा होईपर्यंत हिंदुत्वनिष्ठांनी संघटितपणे लढा देत रहाणे आवश्यक !

मुंबईत दूध भेसळ करणार्‍यांवर कारवाई

अन्नामध्ये भेसळ करणार्‍यांवर कठोर कारवाई होत नसल्याने वारंवार गुन्हे घडतात !

छत्रपती संभाजीनगर येथे सव्वा ३ लाख ग्राहकांची वीज कायमस्वरूपी तोडली !

छत्रपती संभाजीनगर आणि जालना या २ जिल्ह्यांतील एकूण सव्वातीन लाख घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक आदी वीज ग्राहकांनी वीजदेयक भरलेले नाही. यामुळे त्यांची वीज कायमस्वरूपी तोडण्यात आली आहे.

रेंदाळ (जिल्हा कोल्हापूर) येथील धर्मप्रेमींनी उघड्यावर असलेल्या श्री गणेशमूर्ती पुन्हा विसर्जित केल्या !

येथील ग्रामपंचायतीने भाविकांना श्री गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार काही भाविकांनी त्यांच्या श्री गणेशमूर्ती दान केल्या होत्या.