Mandya Ganesh Procession Attacked मंड्या (कर्नाटक) येथे हिंदूंवर मुसलमानांनी केलेल्‍या आक्रमणानंतर उद्वीग्‍न हिंदूंच्‍या प्रतिक्रिया !

श्री गणेशमूर्ती विसर्जनावर मुसलमानांनी आक्रमण केल्‍याचे प्रकरण

भारतात हिंदूंना गणेशोत्‍सव साजरा करायचा असल्‍यास जिल्‍हाधिकार्‍यांची नव्‍हे, तर काय मुसलमानांची अनुमती घ्‍यायची ? – एका हिंदूने दिलेली बोलकी प्रतिक्रिया

मंड्या (कर्नाटक) – ११ सप्‍टेंबरच्‍या रात्री कर्नाटकातील मंड्यामध्‍ये मुसलमानांनी हिंदूंच्‍या मिरवणुकांवर आक्रमण केले. यासंदर्भात एका स्‍थानिक हिंदूने उत्‍स्‍फूर्तपणे प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली आहे. त्‍याने म्‍हटले की, हिंदु समाजामध्‍ये मोठ्या प्रमाणात जागृती होणे आवश्‍यक आहे. हिंदूंना संरक्षणाची आवश्‍यकता आहे. इतिहासातील सर्वच गुन्‍हे पाहिले, तरी हिंदूंनी मुसलमानांच्‍या दुकानांवर आक्रमण केल्‍याची घटना कुठे आढळते का ? ९५ टक्‍के हिंदू असलेल्‍या भारतात हिंदूंना गणेशोत्‍सव साजरा करायचा असल्‍यास त्‍यांनी जिल्‍हाधिकार्‍यांची नव्‍हे, तर काय मुसलमानांची अनुमती घ्‍यायची का ? मुसलमान पेट्रोल बाँब फेकतात, तलवारी दाखवतात. जर हिंदूंनीही तशा तलवारी हातात घेतल्‍या, तर काय परिस्‍थिती होईल, याचा विचार कुणी करेल का ? मुसलमानांनी हिंदूंना डिवचण्‍याचा प्रयत्न करू नये.

दीड कोटी रुपयांची हानी ! – भीमराज, मालक, ‘साधना टेक्‍स्‍टाईल्‍स’

मंड्या येथे हिंदूंच्‍या अनेक दुकानांना जाळण्‍यात आले. यामध्‍ये ‘साधना टेक्‍स्‍टाईल्‍स’ या दुकानाचाही समावेश होता. याविषयी त्‍याचे मालक भीमराज म्‍हणाले की, आमचा दुकानाला आग लागून दीड कोटी रुपयांची हानी झाली आहे. (ही हानी दंगलखोर मुसलमानांकडून वसूल करा ! – संपादक) दुकानातील सर्वच कपडे पूर्ण जळून खाक झाले आहेत. रात्री १२.३० वाजता दुकानाच्‍या आत घुसून लोकांनी आग लावली. मी अग्‍नीशमन पथकाला बोलावून आग विझवली. त्‍यानंतर २०० हून अधिक लोकांनी काचेच्‍या बाटल्‍या, दगड मारत दुकानावर पुन्‍हा आक्रमण केले. या वेळी तेथे उपस्‍थित असलेले पोलीसही पळून गेले. आम्‍हीही प्राण वाचवण्‍यासाठी त्‍यांच्‍या मागे धावत गेलो. जेथे पोलीसच सुरक्षित नसतील, तेथे आम्‍ही कसे सुरक्षित असू शकतो ? दुकान वाचवण्‍यासाठी आम्‍ही २-३ जण आलो, पण १००-२०० लोकांसमोर आम्‍ही काय करू शकतो ? आज आमचा जीव जाईल कि काय, असे वाटत होते. या हानीमुळे मी २० वर्षे मागे गेल्‍यासारखे वाटत आहे. आता परत सगळे मिळवायला हवे.

संपादकीय भूमिका

आज मंड्या येथील हिंदूंवर जी परिस्‍थिती उद़्‍भवली, ती भारतातील सर्वच ठिकाणच्‍या हिंदूंवर उद़्‍भवू नये, यासाठी परिणामकारक संघटन, हाच उपाय !