श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सुरेश नारायण गुळवणी यांचे निधन !

विटा येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ज्येष्ठ धारकरी, हिंदुत्वनिष्ठ आणि दीनदयाळ पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सुरेश नारायण गुळवणी (वय ७२ वर्षे) यांचे ५ सप्टेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता निधन झाले.

खंडोबा हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍यांचे दैवत !

प.पू. सरसंघचालकांनी ५ सप्टेंबर या दिवशी जेजुरी येथील श्री मार्तंड देव संस्थानला भेट देत श्री खंडोबाचे दर्शन घेतले, त्या वेळी ते बोलत होते. देव संस्थान आणि जेजुरी ग्रामस्थांच्या वतीने सरसंघचालकांना मानपत्र प्रदान करण्यात आले.

वाढदिवसाच्या मेजवानीत तरुणीवर अत्याचार

संबंधित तरुणी मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या मेजवानीला गेली. तिथे तिचे अन्य २ मित्रही होते. त्यांनी पुष्कळ मद्य घेतले. पीडित तरुणी घरी जाण्यास निघाली असता तिला उलट्या होऊ लागल्या; म्हणून तिला  लिंबू पाणी देण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध दिले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून कावड यात्रेतील गंगाजल करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी अर्पण !

उत्तराखंडमधील हरिद्वार येथून कोट्यवधी भाविक कावड यात्रेनिमित्त गंगामातेचे पाणी त्यांच्या ग्रामदैवतांना घेऊन जातात.

रिक्शाचालकाकडून छेड काढल्याने विद्यार्थिनीची धावत्या रिक्शातून उडी

मुली आणि महिला यांची असुरक्षितता संपण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणार्‍याला २० वर्षे सक्तमजुरी !

बांधकाम प्रकल्पावर ७ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या अशोक डोंगोरे या सेवानिवृत्त सरकारी कर्मचार्‍याला विशेष न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि १० सहस्र रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

ज्ञानभूमी प्रकल्पाच्या निधीसाठी आळंदी देवस्थानचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने ज्ञानभूमी प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात १३० कोटी रुपयांचा निधी प्राप्त व्हावा, तसेच ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘तुकाराम गाथा’ छपाईसाठी देहू आणि आळंदी संस्थानला प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी प्राप्त व्हावा, यासाठीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.