Karnataka Ganapati Procession Violence : मंड्या (कर्नाटक) येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर पेट्रोल बाँबद्वारे आक्रमण !

  • दर्ग्‍याजवळ ५०० हून अधिक मुसलमानांकडून आक्रमण

  • हिंदूंची अनेक दुकानांत जाळपोळ, कोट्यवधी रुपयांची हानी

  • मुसलमानांनी फेकले दगड आणि चपला

  • काँग्रेसच्‍या पोलिसांकडून बघ्‍याची भूमिका

  • पोलिसांकडून हिंदूंनाच मिरवणूक मागे घेण्‍यासाठी आग्रह

मंड्या (कर्नाटक) – येथील नागमंगल येथील बदरिकोप्‍पल येथे बसवण्‍यात आलेल्‍या श्री गणेशमूर्तीची ११ सप्‍टेंबरच्‍या रात्री विसर्जन मिरवणूक काढण्‍यात आली होती. यावर ५०० धर्मांध मुसलमानांच्‍या जमावाने दगडफेक केली. येथील मैसुरू रस्‍त्‍यावरील एका दर्ग्‍याजवळ मिरवणूक येताच दगडफेक चालू झाली, तसेच चप्‍पल, काचेच्‍या बाटल्‍या आणि पेट्रोलबाँबही फेकण्‍यात आले. या वेळी हिंदूंच्‍या दिशेने धारदार तलवारीही झळकावण्‍यात आल्या. मुसलमान अल्लाहू अकबरच्‍या (अल्ला महान आहे याच्‍या) घोषणा देत होते. याला प्रत्‍युत्तर म्‍हणून हिंदूंनीही ‘जय श्रीराम’च्‍या घोषणा देण्‍यास आरंभ केला.

या वेळी हिंसक झालेल्‍या मुसलमान जमावाने परिसरातील दुकाने आणि वाहने यांना आग लावली. यात हिंदूंच्‍या मालमत्तेची कोट्यवधी रुपयांची हानी झाली. यामुळे हिंदूही आक्रमक झाले. पोलिसांनी लाठीमार करून परिस्‍थिती नियंत्रणात आणण्‍याचा प्रयत्न केला. या घटनेसंदर्भात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला असून पोलिसांनी २३ हिंदू आणि ३० मुसलमान यांना अटक केली. (सर्वधर्मसमभावी वृत्तीच्‍या पोलिसांची नेहमीची पद्धत ! दंगलींच्‍या प्रकरणात ‘समतोल’ राखण्‍यासाठी दंगलखोर मुसलमानांसोबत प्रतिकार करणशर्‍या हिंदूंनाही अटक करणार्‍या पोलिसांवर प्रथम कारवाई करणे आवश्‍यक ! – संपादक) दंगलीच्‍या निषेधार्थ बजरंग दल आणि विश्‍व हिंदु परिषद यांनी १२ सप्‍टेंबरला बंद पुकारला.

ठळक घडामोडी !

१. हिंदूंनी पोलीस ठाण्‍याच्‍या बाहेर श्री गणेशमूर्ती ठेवली आणि मुसलमानांच्‍या विरोधात कारवाई करण्‍यासाठी आंदोलन केले. मागील वर्षीही येथील दर्ग्‍यासमोर अशाच प्रकारची घटना घडली होती.

२. जिल्‍हाधिकारी डॉ. कुमार यांनी घटनास्‍थळी भेट देऊन परिस्‍थितीचा आढावा घेतला. या वेळी त्‍यांनी सांगितले की, नागमंगलमध्‍ये परिस्‍थिती अत्‍यंत तणावपूर्ण झाली आहे. त्‍यामुळे १४ सप्‍टेंबरपर्यंत संचारबंदी लागू करण्‍यात आली आहे. तसेच पोलिसांची अधिक कुमक तैनात करण्‍यात आली आहे.

३. अतिरिक्‍त पोलीस महासंचालक हितेंद्र यांनीही घटनास्‍थळी भेट देऊन परिस्‍थितीची माहिती घेतली.

४. केंद्रीय मंत्री एच्.डी. कुमारस्‍वामी यांनी यावर प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली असून ‘सरकार एका गटाचे लांगूलचालन करत आहे आणि त्‍यामुळे अशा प्रकारे त्‍यांचातील उन्‍माद वाढत आहे’, असे म्‍हटले आहे.

हिंदूंवर आक्रमण होत असतांना पोलिसांकडून बघ्‍याची भूमिका !

एका स्‍थानिक प्रत्‍यक्षदर्शीने वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले की, अनुमाने ५०० मुसलमानांनी आक्रमण केल्‍यावर ‘आम्‍ही पाकिस्‍तान, बांगलादेश किंवा अफगाणिस्‍तान येथे आहोत कि काय ?’, असे वाटत होते. दगडफेकीत ४ पोलिसांना दुखापत झाली आणि १५ हिंदू घायळ झाले. हिंदूंवर आक्रमण होत असतांना पोलीस बघ्‍याची भूमिका घेत होते. ते आक्रमणकारी मुसलमानांना समजावण्‍याऐवजी हिंदूंवर लाठीमार करत होते, तसेच ‘येथून मिरवणूक नेऊ नका’, असे सांगत होते. काही पोलीस हिंदूंना अश्‍लील शिवीगाळ करत होते. घटनास्‍थळी कांग्रेसचे तालुकाध्‍यक्ष राजेश हेही पोलिसांसमावेत हिंदूंना मागे पाठवत होते.

हे कृत्‍य अत्‍यंत गंभीर आहे ! – मुख्‍यमंत्री सिद्धरामय्‍या

मुख्‍यमंत्री सिद्धरामय्‍या

ही घटना कायदा आणि सुव्‍यवस्‍था यांच्‍यासाठी मारक आहे. सरकारने याला अत्‍यंत गंभीरतेने घेतले आहे, असे वक्‍तव्‍य राज्‍याचे मुख्‍यमंत्री सिद्धरामय्‍या यांनी केले. (मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या काँग्रेसच्‍या राज्‍यात भविष्‍यात हे दंगलखोर मोकाट सुटले, तर आश्‍चर्य वाटणार नाही ! – संपादक)

दंगल मुसलमानांनी केली, तरी हिंदूंना अटक का ? – भाजप आमदार सी.टी. रवि

भाजप आमदार सी.टी. रवि

नागमंगलमधील दंगल ही एका समुदायाच्‍या गुंडांची उद्देशपूर्ण हिंसा आहे.

पेट्रोल बाँब फेकून दंगलीला उत्तेजन दिलेल्‍या मुसलमान दंगलखोर्‍यांना अटक न करता मिरवणूक समितीच्‍या सदस्‍यांना अटक करणार्‍या पोलिसांच्‍या कृत्‍याची मी कडक शब्‍दांत निंदा करतो. या विषयी त्‍वरित उच्‍चस्‍तरीय तपास करावा आणि कठोर कारवाई करावी.

दोषींवर त्‍वरित कारवाई करा आणि इतर गणेशोत्‍सवांना सुरक्षा द्या ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे राज्‍य समन्‍वयक गुरुप्रसाद गौडा

या आक्रमणावर हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्धीपत्रक काढले आहे. समितीचे राज्‍य समन्‍वयक गुरुप्रसाद गौडा म्‍हणाले की, धर्मांध मुसलमानांची ही कृती पाहिल्‍यावर लक्षात येते की, हे आक्रमण पूर्णपणे पूर्वनियोजित होते आणि दंगल घडवण्‍यासाठीच हे कृत्‍य करण्‍यात आले होते. हिंदु जनजागृती समिती या घटनेचा तीव्र निषेध करते. पोलिसांच्‍या उपस्‍थितीतही एवढे मोठे आक्रमण होणे, हे लज्‍जास्‍पद आहे. पोलिसांनी अटक केलेल्‍यांपैकी जे कुणी दोषी आढळतील, त्‍यांच्‍यावर तात्‍काळ कारवाई करण्‍यात यावी. राज्‍यभरात असे अनेक जिल्‍हे आहेत, जिथे गणेशविसर्जन व्‍हायचे आहे. त्‍यामुळे मंड्यासारखी घटना इतरत्र घडू नये, यासाठी पोलीस विभागाने कडक दक्षता घ्‍यावी.

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्‍हटले आहे की, गृहमंत्री डॉ. परमेश्‍वर यांनी ही घटना आकस्‍मिक असून कोणतीही मोठी दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही, असे म्‍हटले आहे. गृहमंत्र्यांचे हे विधान अत्‍यंत दायित्‍वशून्‍यतेचे आहे. अशा विधानांमधूनच धर्मांधांना बळ मिळते. गृहमंत्र्यांच्‍या वक्‍तव्‍याचा समिती तीव्र निषेध करते. याखेरीज धर्मांधांकडून दगडफेक होऊनही गणेशमंडळाच्‍या सदस्‍यांची झालेली अटक काँग्रेसच्‍या तुष्‍टीकरणाच्‍या धोरणावर पुन्‍हा प्रकाश टाकते. शिवमोग्‍गा येथे ईद मिलादच्‍या वेळी झालेली दंगल हीसुद्धा अपघाती घटना असल्‍याचे गृहमंत्र्यांनी सांगितले होते. आता त्‍यांनी पुन्‍हा असेच वक्‍तव्‍य केले असून ते लोकांच्‍या रोषाचे लक्ष्य झाले आहेत.

राष्‍ट्रघातकी आणि हिंदुविरोधी कारवायांचा अड्डा बनलेले दर्गे आणि मशिदी !

भारतात अनेक ठिकाणी हिंदूंच्‍या धार्मिक मिरवणुका मशिदी किंवा दर्गे यांच्‍या परिसरात पोचल्‍यावर त्‍यांच्‍यावर आक्रमण होते. भारतात अनेक मशिदींमध्‍ये देशविरोधी कारवाया चालतात, हे पुराव्‍यानिशी समोर आले असतांना त्‍यांच्‍यावर टाळे का ठोकले जात नाही ?

मंड्या येथील मैसुरू रस्‍त्‍यावरील दर्ग्‍याच्‍या परिसरात हिंदूंच्‍या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर दुसर्‍यांदा आक्रमण झाले. भारतात अनेक ‘सेक्‍युलर’ हिंदू दर्ग्‍यात जाऊन माथा टेकतात, हे लज्‍जास्‍पद नव्‍हे का ?

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्‍या गणेशोत्‍सव मिरवणुकीवर आक्रमण व्‍हायला मंड्या भारतात आहे कि बांगलादेशात ?
  • हिंदूंच्‍या देवतेच्‍या विसर्जन मिरवणुकीवर आक्रमण होत असतांना पोलीस हिंदूंचे रक्षण न करता शेपूट घालत असल्‍याने जर हिंदू हे राज्‍यघटनेने स्‍वसंरक्षणाच्‍या दिलेल्‍या अधिकाराचा वापर करू लागले, तर त्‍यात चूक ते काय ?
  • हिमाचल प्रदेशपासून कर्नाटक अशा काँग्रेसशासित राज्‍यांमध्‍ये हिंदूंवरच आक्रमणे होत आहेत. शिमल्‍यात बेकायदेशीर मशिदीच्‍या विरोधात मोर्चा काढणार्‍या हिंदूंवर पोलिसांकडून अमानुष लाठीमार होतो, तर मंड्यामध्‍ये त्‍यांच्‍या मिरवणुकांवर मुसलमानांनी आक्रमण केल्‍याने पोलीस हिंदूंनाच मिरवणूक थांबवण्‍याचा आग्रह करतात, हे जाणा !
  • मुसलमानांनी आक्रमण केल्‍यावर बघ्‍याची भूमिका घेणारे आणि हिंदूंनाच मिरवणूक मागे घेण्‍यास सांगणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? अशांचा भरणा असलेले पोलीसदल प्रथम विसर्जित करा !