‘तिरुमला’चे सुरेश कुटे आणि अर्चना कुटे पोलिसांच्या कह्यात !

राज्यभर गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ‘ज्ञानराधा बँक घोटाळ्या’च्या प्रकरणी ‘तिरुमला उद्योग समुहा’चे प्रमुख सुरेश कुटे, त्यांच्या पत्नी अर्चना कुटे आणि सहसंचालक आशिष पाटोदेकर यांना बीड पोलिसांनी पुणे येथून कह्यात घेतले आहे.

रायगडावर येणारे शिवभक्त आणि मावळे यांना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी ह.भ.प. आकाश महाराज भोंडवे यांचे ‘आमरण उपोषण’ !

रायगडावर छत्रपती श्री शिवरायांची समाधी, हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, निवार्‍याची सोय यांसह इतर मूलभूत सुविधांचा अभाव आहे.

श्रीराम सेनेकडून महिलांना त्रिशूल दीक्षा !

राज्य सरकार हिंदु महिलांना संरक्षण देत नाही. हिंदु महिलांच्या साहाय्यासाठी श्रीराम सेनेने साहाय्य दूरभाष (हेल्पलाईन) योजना प्रारंभ केली आहे.

Nepal Recalls Ambassadors : नेपाळ सरकारने भारत आणि अमेरिका यांच्यासह ११ देशांतील राजदूतांना परत बोलावले !

नेपाळचे पंतप्रधान प्रचंड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी भारतात येण्याची शक्यता आहे. या भारत दौर्‍यापूर्वी नेपाळ सरकारने हे पाऊल उचलले आहे.

Udupi Dr.Robert Rebel Absconding : उडुपी (कर्नाटक) येथे लैंगिक अत्याचार करणारा सरकारी डॉ. रॉबर्ट रिबेल पसार !

डॉ. रॉबर्ट कामाच्या ठिकाणी महिलांवर लैंगिक अत्याचार करत असल्याविषयी जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

I.N.D.I. Front Sinking Modi : ‘इंडी’ आघाडी आता गतीने बुडणार ! – नरेंद्र मोदी

इंडी आघाडीवाल्यांना अंदाज नाही की, ते हळूहळू बुडत होते आणि आता ते गतीने बुडणार आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

 ‘Hamaare Barah’ Release Approved : ‘हमारे बारह’ या चित्रपटाच्या प्रसारणाला मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाची अनुमती !

मुसलमान समाजाचे सत्य स्वरूप समोर आणणार्‍या चित्रपटावर बंदी आणण्यासाठी प्रयत्न करणारे मुसलमान ! ‘हमारे बारह’ चित्रपट प्रदर्शित करण्यास प्रतिबंध करावा’, अशी याचिका प्रविष्ट केली होती.

Sharan Pumpwell  Court Stayed Case : शरण पंपवेल यांच्यावरील गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती

कंकनाडी येथील रस्त्यावर नमाजपठण केल्याविषयी शरण पंपवेल यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.

मुंबई उत्पादन शुल्क विभागाकडून बारमालकांची वकिली !

समाजात ही नावे हिंदूंच्या देवतांची म्हणून पाहिली जातात. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने असोसिएशनने दिलेल्या पत्रांची शासनाकडे वकिली न करता शासन आदेशावर कार्यवाही करून हिंदूंच्या धार्मिक भावनांचा सन्मान करावा.

अमरावतीतील भाजपच्या पराभूत उमेदवार नवनीत राणा यांच्याविषयी अश्‍लील शेरेबाजी !

अशा वासनांधांना कठोरात कठोर शिक्षाच व्हायला हवी !