Sharan Pumpwell  Court Stayed Case : शरण पंपवेल यांच्यावरील गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती

शरण पंपवेल

मंगळुरू (कर्नाटक) – कंकनाडी येथील रस्त्यावर नमाजपठण केल्याविषयी सामाजिक माध्यमांतून चिथावणीखोर संदेश प्रसारित केल्यावरून विश्‍व हिंदु परिषदेचे विभाग सहसंचालक शरण पंपवेल यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शरण पंपवेल यांच्या बाजूने न्यायालयात अधिवक्ता अरुण श्याम यांनी युक्तीवाद केला.