खामगाव येथे धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट प्रसारित; ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद !

प्रतिकात्मक चित्र

खामगाव (जिल्हा बुलढाणा) – शहरात धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी तुषार चंदेल यांच्यासह ७ जणांविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

१. शहरातील ‘सतीफैल काँग्रेस’ नावाच्या सामाजिक माध्यमांवरील गटावर तुषार चंदेल याने ‘खामगाव येथे काँग्रेसच्या प्रचारासाठी येणारे खासदार इमरान प्रतापगढी यांच्या ‘रोड शो’वर दगडफेक होईल’, अशी अफवा पसरवणारी पोस्ट प्रसारित केली.

२. त्याने धर्मांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी तुषार चंदेलसह सामाजिक माध्यम गटाचे महानंद यादव आणि इतर ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला.

३. याआधीही धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट घातल्याप्रकरणी वाडी येथील निखिल देशमुख याच्यावर गुन्हा नोंद केला होता.

४. निवडणूककाळात शहरात आतापर्यंत असे २ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. ‘नागरिकांनी अशा पोस्ट घालू नयेत’, असे आवाहन करण्यात आले आहे.