राजकीय पक्षांनी सोयीकरता युती करण्याच्या पलीकडे पहावे !

‘भाजपने १५ इतर पक्षांशी केलेली युती लोकसभेच्या संपूर्ण ५ वर्षांच्या कालावधीपर्यंत आहे तशीच असावी’, असे कोणतेही प्रावधान (तरतूद) घटनेत नाही. याचप्रमाणे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली असलेली ‘इंडी’ आघाडीही लोकसभेत बहुमत मिळवण्यास अयशस्वी ठरली.

पनवेलमध्ये १ मेट्रिक टन वजनाच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त !

यातून ५५ सहस्र रुपयांचा दंड व्यापार्‍यांकडून वसूल केला आहे. मागील अनेक वर्षांत १ मेट्रिक टन प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्याची पनवेल महापालिकेची ही पहिलीच वेळ आहे.

चोरीला गेलेले ३१ भ्रमणभाष पोलिसांनी शोधले !

संबंधित पोर्टलवर भ्रमणभाषची तांत्रिक माहिती टाकल्यावर तो सध्या कोणत्या ठिकाणी आहे ?, त्यातील सिमचा क्रमांक काय ?, याची माहिती मिळते. अशा प्रकारे यातील एक आयफोन दुबई येथून मिळवण्यात आला आहे.

संसदेतून राजदंड (सेंगोल) हटवून तेथे राज्यघटना ठेवा !

संसदेत स्थापन करण्यात आलेला राजदंड (सेंगोल) हटवून त्या ठिकाणी देशाची राज्यघटना ठेवावी, लेखी मागणी समाजवादी पक्षाचे खासदार आर्.के. चौधरी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून केली.

थोडक्यात : ५५ कोटींहून अधिक किमतीचा अमली पदार्थ साठा जप्त !………बुलेट ट्रेनसाठी विरार स्थानकाचा समावेश !

गेल्या ६ महिन्यांत ठाणे पोलिसांनी अमली पदार्थांच्या खरेदी-विक्री प्रकरणात ११२ आरोपींना अटक केली आहे. ५५ कोटी ७६ लाख रुपयांहून अधिक किमतीचे विविध प्रकारचे अमली पदार्थ, अमली पदार्थ निर्मितीचे साहित्य आणि रसायने जप्त केली आहे.

लातूर येथील ‘नीट’ घोटाळ्यातील गंगाधर याला पोलिसांनी अटक केल्याचा त्याच्या पत्नीचा दावा !

गंगाधर गुंडे बिहारमधील काही लोकांच्या संपर्कात होता आणि नीट पेपरफुटी घोटाळ्यात त्याचा मोठा हात असल्याचा आरोप आहे.

नंदुरबार येथे कृषी सेवाकेंद्रांवर बनावट औषधांची विक्री !

जिल्ह्यातील अनेक कृषी सेवाकेंद्रांवर सर्रास बनावट औषधांची विक्री होत आहे.

प्रत्येक राज्यात हिंदु विचारवंतांचे संघटन होणे आवश्यक ! – मोहन गौडा, कर्नाटक राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

एका संदेशावरून केवळ २ दिवसांमध्येच मुसलमान एकवटले. हिंदूंनीही अशा प्रकारची संपर्कव्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी हिंदु विचारवंतांचे संघटन आवश्यक आहे.

‘खोटे बोल पण रेटून बोल’, अशी विरोधकांची मानसिकता आहे ! – मुख्यमंत्री

लोकसभेतील विजयामुळे विरोधक छाती फुगवून प्रसारमाध्यमांसमोर आले आहेत; पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकणार नाही. आम्हाला दिलेल्या पत्रात कोणतीही सूत्रे नाहीत. तीच तीच सूत्रे त्या पत्रात मांडली जात आहेत.

बेळगाव येथील परमार्थ निकेतन, अर्चना मोरे पाटील आणि रेश्मा पुणेकर यांना ‘लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई स्मृती’ पुरस्कार घोषित !

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या १२७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !