Udupi Dr.Robert Rebel Absconding : उडुपी (कर्नाटक) येथे लैंगिक अत्याचार करणारा सरकारी डॉ. रॉबर्ट रिबेल पसार !

डॉ. रॉबर्ट रिबेल

कुंदापूर (कर्नाटक) – लैंगिक अत्याचारासह विविध अत्याचार करण्याच्या आरोपाखाली कुंदापूरच्या सरकारी रुग्णालयातील चिकित्सक वैद्य अधिकारी पदावर काम करत असलेला डॉ. रॉबर्ट रिबेल याला निलंबित केल्याचा आदेश काढण्यात आला आहे. सध्या डॉ. रॉबर्ट पसार असून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे समजते.

उडुपी जिल्हा कुटुंब कल्याण अधिकार्‍यांनी चौकशी करून सोपवलेल्या अहवालामध्ये डॉ. रॉबर्ट कामाच्या ठिकाणी महिलांवर लैंगिक अत्याचार करत असल्याविषयी जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्याच्याविरुद्ध साक्ष देण्यासाठी सरकारी कर्मचारी पुढे येण्यास सिद्ध नाहीत. या पार्श्‍वभूमीवर शिस्तभंगाची त्वरित कारवाई करत त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.