सातारा जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया आजपासून चालू !

सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने २३५ पदांसाठी १९ जूनपासून भरती प्रक्रिया चालू करण्यात येणार आहे.

आषाढी वारीतील वारकर्‍यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी ‘आपला दवाखाना’ सिद्ध !

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणार्‍या वारकर्‍यांना आरोग्य विभागाकडून वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व पालखी मार्गांवर आधुनिक वैद्यांसह ६ सहस्र ३६८ वैद्यकीय कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हिंदु जनजागृती समितीकडून भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांचा सन्मान !

नुकतेच संतपद प्राप्त केलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील सनातनच्या सेवाकेंद्रात सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले ‘ललितात्रिपूर सुंदरी यंत्रा’चे पूजन !

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सूक्ष्मातून येणारे अडथळे दूर व्हावेत आणि त्यासंबंधीची सेवा करणारे हिंदुत्वनिष्ठ अन् कार्यकर्ते यांना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी उर्जा प्राप्त व्हावी’, या उद्देशाने हे पूजन करण्यात आले.

विशाळगडावर ‘बकरी ईद’च्या दिवशी पशूबळी नाही !

हिंदुत्वनिष्ठांचा दबाव आणि प्रशासनाची ठाम भूमिका यांचा परिणाम ! यांमुळे १७ जून या दिवशी विशाळगडावर ‘बकरी ईद’ला पशूबळी दिला गेला नाही. त्यामुळे गडाचे पावित्र्य जपले गेले !

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते करण्यात आले ‘षोडश-नित्यदेवी यंत्रा’चे पूजन !

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सूक्ष्मातून येणारे अडथळे दूर व्हावेत आणि त्यासंबंधीची सेवा करणारे हिंदुत्वनिष्ठ अन् कार्यकर्ते यांना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी उर्जा प्राप्त व्हावी’, या उद्देशाने हे पूजन श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

NOTA : वर्ष २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकीत ६७ लाख ८८ सहस्र ४९२ मतदारांकडून नोटाचा वापर !

भारतात ६७ लाखांहून अधिक मतदारांनी ‘नोटा’चा वापर करणे, याचा अर्थ  उमेदवार अपात्र असल्‍याचे इतक्‍या मोठ्या प्रमाणात मतदारांना वाटले, असाच होतो. राजकीय पक्ष याचा गांभीर्याने विचार करणार का ?

भारतात मुंबई प्रथम क्रमांकाचे सर्वांत महागडे शहर !

मुंबई शहर भारतातील सर्वांत महागड्या शहरांच्या सूचीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर जगभरातील महागड्या शहरांमध्ये मुंबईचा १३६ वा क्रमांक लागतो.

धर्मांध आरोपींना नमाजला सोडवण्यासाठी जिन्सी पोलीस ठाण्यात धर्मांधांचा गोंधळ !

बकरी ईदनिमित्ताने अवैध कत्तलीसाठी आणलेले ९५ गोवंशीय पोलिसांनी सोडवले. या प्रकरणातील २ धर्मांध आरोपींना जिन्सी पोलिसांनी कह्यात घेतले होते;

झारखंड : सुरक्षादलांच्या कारवाईत ४ माओवादी ठार !

गेल्या काही वर्षांत नक्षलवादाला परिणामकारक लगाम लावण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. आता त्याच्या समूळ नायनाटासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे !