मुंबई – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला तिच्या ग्राहक साहाय्य कक्षाच्या क्रमांकावर एक संपर्क आला होता. संबंधिताने स्वतःला ‘लष्कर-ए-तोयबा’चा विशेष कार्यकारी अधिकारी असल्याचे सांगून ‘बँक बंद करा. एक मोटारगाडी धडक देणार आहे’, अशी धमकी दिली. १६ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता हा दूरभाष आला होता. बँकेच्या सुरक्षारक्षकाने माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली; मात्र हा खोडसाळपणा असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.