
शिवमोगा (कर्नाटक) – कर्नाटकातील शिवमोगामध्ये एका मुसलमान मुलीला हिंदु मुलासमवेत फिरल्याविषयी इस्लामी कट्टरतावाद्यांनी मारहाण केली. नंतर या कट्टरतावाद्यांनी तिला मशिदीत नेले आणि तेथे तिला पुन्हा मारहाण केली. आरोपींच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. आरोपींमध्ये मकबूल पाशा, तोहिद, रफीक तसीना, तंजिया, कलीम, सुन्नू, नसरुल्ला, अब्दुल, जिशान, रिझवान, अब्दुल्ला, अब्बास अली आणि अकबर यांचा समावेश आहे.
याविषयीच्या एका वृत्तानुसार, एका मुसलमान तरुणीला गावात हिंदु मुलासमवेत फिरतांना काही मुसलमान तरुणांनी पाहिले. त्यांनी तिला अडवून जाब विचारला. त्यावर तिने काहीही चुकीचे केले नसल्याचे त्यांना सांगितले. तेव्हा त्या मुसलमान तरुणांनी तिच्यावर आक्रमण केले. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाहिंदु मुलींना पळवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारे धर्मांध मुसलमान तरुण स्वतःच्या धर्मातील मुलींचे हिंदु तरुणांसमवेत फिरणेही खपवून घेत नाहीत. एरव्ही हिंदूंना ‘कट्टरतावादी’ ठरवणारे पुरोगामी आता या धर्मांधांना ‘कट्टरतावादी’ का ठरवत नाहीत ? |
कुंभपर्वासाठी ३४ सहस्र ७३२ कोटी रुपयांचे प्रावधान – उदय सामंत, उद्योगमंत्री
मुसलमान युवती आणि तिचा सहकारी यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !
रंगपूर (बांगलादेश) येथील एका हिंदु दुकानदारावर जीवघेणे आक्रमण !
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील दत्तपीठ परिसराच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र रचले जात असल्याचा दावा !