Indian Flag in Jammu & Kashmir :‘ओम मंडली’च्या वतीने जम्मू-काश्मीर राज्यात ‘वन्दे मातरम्’ गाऊन तिरंगा फडकावला !

रायपूर (छत्तीसगड) येथील ‘ओम मंडली शिवशक्ती अवतार सेवा संस्थान’ यांच्या वतीने जम्मू-काश्मीर राज्यात शिवलिंगासमवेत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात ‘ओम’च्या झेंड्यासमवेत तिरंगा झेंडाही फडकावण्यात आला.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : आज रिक्शाचालकांचे आंदोलन !; मृतदेह ३ घंटे रुग्णालयात पडून !…

वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास विलंब शुल्क आकारण्याच्या सूचना केंद्रीय परिवहन विभागाने राज्य सरकारला दिल्या आहेत.

आषाढी पालखी वारीनिमित्त १ सहस्र फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध !

नगरपंचायतीकडून वारीनिमित्त विशेष सुविधा देणे योग्य आहे; परंतु नियमितची स्वच्छता तीर्थक्षेत्री नेहमीच का होत नाही ? हेही पहाणे आवश्यक !

पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील सुरक्षा उपकरणे गायब !

महत्त्वाच्या मंदिरामध्ये असे कसे होते ? याला उत्तरदायी असणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या पुतण्याच्या चारचाकीच्या धडकेत १ जण ठार !

मयूर मोहिते पाटील याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मयूर मोहितेने मद्यप्राशन केले होते कि नाही ? याचे अन्वेषणही पोलीस करत आहेत. पुतण्याने मद्यप्राशन केलेले नव्हते, असे दिलीप मोहिते पाटलांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील नामांकित हॉटेलमध्ये अमली पदार्थ मेजवानी !

विद्यार्थ्यांची अमली पदार्थांची मेजवानी करण्यापर्यंत मजल जाणे, हा मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचा दुष्परिणाम !

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने बाळशास्त्रींचे कार्य आणि विचार नव्याने लोकांसमोर आणले ! – डॉ. तानाजीराव चोरगे

‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरण आणि स्मारक कार्यात देणगी देऊन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सामाजिक बांधीलकी दाखविली आहे.

रत्नागिरी सीए शाखेच्या वतीने ‘प्रोफेशनल इथिक्स’, ‘प्रोफेशनल अपॉर्च्युनिटी’ कार्यशाळेला प्रतिसाद

रेरा सर्टिफिकेट्स देतांना बांधकाम खर्च, निवासी सदनिका धारकांकडून येणारे पैसे, तसेच विक्री न झालेल्या सदनिकांचे मूल्यांकन याची माहिती कशी द्यावी, याविषयी सखोल विवेचन केले.

 चिपळूण ते डेरवण रुग्णालयापर्यंत रुग्णांसाठी विनामूल्य बससेवा चालू

डेरवण रुग्णालय अनेक रुग्णांचा आधार बनले आहे. एकाच रुग्णालयात रुग्णाला आजार गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वीच योग्य उपचार मिळावेत, यासाठी विनामूल्य बस सेवेचा निर्णय घेतला आहे.