अल्पसंख्यांकांच्या मतावर निवडून आल्याचा ठाकरे यांच्यावर ठपका ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी सर्वाधिक काम केले; मात्र युतीसमवेत असतांना त्यांनी २३ पैकी १८ जागा जिंकल्या. यंदाही ते पुष्कळ फिरले; मात्र ९ जागा जिंकल्या.

‘ॲप’ आधारित टॅक्सीचालकाने भाडे स्वीकारून रहित केल्यास आस्थापनाला भुर्दंड !

ॲप आधारित टॅक्सीसेवेच्या अंतर्गत अनेक चालक भाडे स्वीकारून अचानक रहित करतात. असा प्रकार घडल्यास आता त्याचा भुर्दंड संबंधित आस्थापनाला बसणार आहे. तसे केल्यास प्रवाशांना भरपाई देण्याची महत्त्वाची शिफारस ‘ॲप आधारित टॅक्सी नियमन समिती’ने केली आहे.

आषाढी यात्रेसाठी ‘एस्.टी.’ ५ सहस्र विशेष गाड्या सोडणार !

आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल नामाचा जयघोष करत श्री श्रेत्र पंढरपूरला जाणार्‍या भाविक प्रवाशांसाठी ‘एस्.टी.’ने ५ सहस्र विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.

जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून ‘आरोग्य भारती’च्या वतीने वृक्षारोपण !

जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून ‘आरोग्य भारती’ कोल्हापूर यांच्या वतीने ‘धन्वन्तरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज’ निपाणी येथे वृक्षारोपण करण्यात आले.

कोल्हापूर शहरातील रस्ते, वाहतूक आणि नालेस्वच्छता यांची कामे गतीने करा ! – राजेश क्षीरसागर

महानगरपालिकेसाठी वितरीत केलेल्या विकास निधीची मुदत संपण्याआधी कामे करा. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे.

आगाऊ शुल्क न भरल्याने ११२ विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारला !

शुल्क भरण्यासाठी २ दिवस असतांनाही शाळेने अशी अरेरावी का केली ? या प्रकरणी संबंधितांना खडसवायलाच हवे !

नवी मुंबईत मोठ्या प्रमाणातील अनधिकृत होर्डिंगमुळे शहराचे विद्रूपीकरण !

शहरात अनधिकृत होर्डिंगचे पेव फुटले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या विजयी उमेदवारांची विज्ञापने मोठ्या प्रमाणात विनाअनमुती लावण्यात आली आहेत. यामुळे शहराचे विद्रूपीकरण झाले आहे. यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचा लाखो रुपयांचा महसूल प्रतिवर्षी बुडतो.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच आयोजित ज्योतिष संमेलन उत्साहात !

कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेले ज्योतिष संमेलन उत्साहात पार पडले. विलासराव जाधव यांचे उज्ज्वल ज्योतिष मार्गदर्शन केंद्र, ‘वेदिया ग्राफिक्स’, अखिल भारत हिंदु महासभा आणि ‘वैदिक सनातनी ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रखर राष्ट्रभक्त होते ! – अविनाश धर्माधिकारी

देशातील पाठ्यपुस्तकांमध्ये सर्वच क्रांतीकारकांचा इतिहास शिकवला जाण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत !