वागातोर येथे रात्री होणार्‍या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला !

अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना मोठ्या आवाजातील ध्वनी ऐकू येत नाही कि ते जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष करतात ?

आग वेगाने पसरल्याने कामगारांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही !

इमारतीच्या तळमजल्यावरील स्वयंपाकघरात अचानक सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानच्या संरक्षण खर्चात १५ टक्के वाढ !

जनतेला खाण्यासाठी अन्न मिळणे कठीण झाले असतांनाही पाकचे सरकार सैन्यावरील खर्चात मात्र वाढ करते आणि तेथील जनता ते स्वीकारते. यावरून पाकची मानसिकता लक्षात येते !

वक्फ मंडळाला १० कोटी रुपये देऊन विधानसभा निवडणुकीत हिंदूंचीही मते गमावणार का ?

वक्फ मंडळाच्या सक्षमीकरणासाठी १० कोटी रुपये देऊन विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही हिंदूंचीही मते गमावणार आहात का ?, असा संतप्त प्रश्‍न उपस्थित करणारा व्हिडिओ अभिनेत्री केतकी चितळे यांनी ‘एक्स’ खात्यावरून प्रसारित केला आहे.  

मालाड (मुंबई) येथे ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये आढळला मानवी बोटाचा तुकडा !

ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या संबंधित दोषींवर कठोरात कठोर कारवाई करायला हवी ! यासह असे आईस्क्रीम विकणार्‍या ‘यम्मो’ आस्थापनावरही बंदी आणायला हवी !

नागपूर येथे ‘पबजी’च्या नादात तरुणाचा पंप हाऊसच्या पाण्यात बुडून मृत्यू !

भ्रमणभाषमधील खेळांच्या आहारी जाऊन आयुष्य उद्ध्वस्त करून घेणार्‍या तरुण पिढीला पालकांनी दिशा देणे आवश्यक ! पालकांनी ‘पबजी’च्या अतिरेकाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन आपल्या मुलांना वेळीच सतर्क करावे !

अंकले (जिल्हा सांगली) येथे २० जणांना जेवणातून विषबाधा !

कार्यक्रमात पुरणपोळी आणि आमरस यांचे जेवण दिले होते. या जेवणानंतर २० जणांना उलट्या आणि जुलाब होऊ लागल्या

मिरज येथे महापालिकेने ३ धोकादायक घरे पाडली !

बुधवार पेठ, स्वामी वाडाजवळील एका घराची जुनी कमान जेसीबीच्या साहाय्याने पाडली, तसेच इसापुरे गल्ली येथील २५ वर्षांपूर्वीचे जुने पडके घर पाडण्यात आले.

झाकीर नाईकला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी !

संयुक्त राष्ट्र संघात झाकीर नाईक याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषीत करण्यासाठी, तसेच त्याला भारताच्या स्वाधीन करण्यासाठी मलेशिया सरकारवर भारत सरकारने दबाव निर्माण करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे तळोदा आणि नंदुरबार येथे केली आहे.

जर्मन बेकरी बाँबस्फोटातील आरोपीला किती काळ एकांतात ठेवणार ?

पुणे येथील जर्मन बेकरीमध्ये वर्ष २०१० मध्ये घडलेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी आरोपी हिमायत बेग जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याला किती काळ एकांतात ठेवणार ?, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने नाशिक कारागृह प्रशासनाकडे केली आहे