पक्षाने दायित्व दिल्यास स्थानिक राजकारणात येऊ ! – केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक

पक्षाने दायित्व दिल्यास स्थानिक राजकारणात येण्यास मी सिद्ध आहे. नशिबात असेल, तर मुख्यमंत्रीपदही मिळेल, असा दावा केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केला.

पुनर्वसन न झाल्याने माणगाव खोर्‍यातील टाळंबा धरणाला प्रकल्पग्रस्तांचा विरोध कायम

माणगाव खोर्‍यातील नियोजित टाळंबा धरण प्रकल्प शासनाच्या नाकर्तेपणामुळे ४३ वर्षे रखडला आहे. प्रारंभी अंदाजे ७० कोटी रुपये खर्च असणारा हा प्रकल्प आता ६ ते ७ सहस्र कोटी रुपयांवर पोचला आहे.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘महाराज’ या चित्रपटाच्या प्रसारणावर देशभरात बंदी आणावी !

अभिनेता आमीर खान यांचा मुलगा जुनैद खान निर्मित ‘महाराज’ या चित्रपटात जाणीवपूर्वक हिंदु संतांना दुराचारी, गुंड, वासनांध दाखवले आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रसारणावर देशभरात बंदी आणण्याविषयी १२ जून या दिवशी पुणे येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन घेण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची घोडा अन् उंट यांवरून मिरवणूक काढली !

शाळेचा प्रारंभ चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षक अन् विद्यार्थी यांना गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते. १५ जून या दिवशी येथे ‘शाळा प्रवेशोत्सव-२०२४’ उत्साहात साजरा करण्यात आला.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची सभा !

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची सभा अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली. बकरी ईद साजरी करण्याच्या पार्श्वभूमीवर कायद्यानुसार असलेल्या प्रावधानांचे पालन करण्याच्या सूचना उपजिल्हाधिकार्‍यांनी दिल्या.

सातारा येथे साखर कारखान्यांसाठी ऊस तोडणी वाहतूक आणि दलाली यांचे एकच दरपत्रक !

सातारा जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या एकत्रित बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीमध्ये संपूर्ण जिल्ह्यासाठी ऊस तोडणी वाहतूक आणि दलाली यांच्या (कमिशनच्या) एकाच निश्चित दरपत्रकास एकमुखी अनुमती देण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना आणि वैष्णोदेवी यात्रेकरूंवर झालेले आतंकवादी आक्रमण यांचा निषेध !

१६ जून या दिवशी ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने ‘हिंदु जनआक्रोश मशाल मोर्चा’ काढण्यात आला. हडपसर आणि पंचक्रोशीतील सहस्रो शिवप्रेमींनी या मोर्च्यात सहभाग घेतला.

जपानमध्ये पसरले रुग्णांचे मांस खाणारे जीवाणू :  ९७७ रुग्ण आढळले !

जपानमध्ये एक नवीन धोकादायक आजार समोर आला आहे. यामध्ये ‘बॅक्टेरिया’ रुग्णाच्या शरिरातील मांस खातात. ‘स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम’ (एस्.टी.एस्.एस्.) असे या आजाराचे नाव आहे.

काश्मीरमधील जगातील सर्वांत उंच रेल्वे पुलावर घेण्यात आली रेल्वे वाहतुकीची चाचणी

काश्मीरमधील चिनाब नदीवर जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल बांधून पूर्ण झाला आहे. लवकरच या मार्गावर रेल्वे वाहतूक चालू होणार आहे.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत ९८ टक्के अपक्ष उमेदवारांना गमवावी लागली अनामत रक्कम !

अपक्ष उमेदवारांपैकी तब्बल ९८ टक्के, म्हणजे ६०७ उमेदवारांना त्यांची अनामत रक्कम (‘डिपॉझिट’) राखता आली नाही. राजकीय पक्षांचे उमेदवार अणि अपक्ष उमेदवार मिळून महाराष्ट्रातील एकूण ९७४ उमेदवारांना अनामत रक्कम गमवावी लागली आहे.