दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या !; डोक्यात दगड घालून प्रियकराकडून प्रेयसीची हत्या !…

येथील ६ वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमीष दाखवून ३५ वर्षीय सुभाष इमाजी भिल याने तिच्यावर अत्याचार केले आणि तिची हत्या केली. संशयित आरोपी फरार आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मडगाव पालिकेचा कनिष्ठ कारकून निलंबित

फेस्ताच्या फेरीतून गोळा केलेले १७ लाख ४० सहस्र रुपये पालिकेत जमाच केले नाहीत.

उत्तर गोवा समुद्रकिनारपट्टी भागातील अनेक क्लब प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अनुमतीविना कार्यरत

व्यावसायिक आस्थापने विनाअनुमती कार्यरत कशी काय असतात ?

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंधित सदस्यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला !

बंदी घातलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंध असणे आणि सरकार उलथवून टाकण्याचा कट रचणे या आरोपांवरून वर्ष २०२२ मध्ये महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने अटक केलेल्या तिघांना मुंबई उच्च न्यायालयाने…

अभिनेत्री नूर मालाबिका हिच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी !

काही दशकांपूवी आत्महत्या केलेल्या दिव्याभारती पासून ते आताचे सुशांत सिंग आणि त्याची साहाय्यक दिशा सालियन अशा अनेकविध कलाकारांच्या आत्महत्येनंतर तरी हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा संशयास्पद प्रकरणांचे..

चारा उपलब्धतेविषयी शास्त्रीय पद्धतीने सर्व्हे करा ! – जिल्हाधिकारी

वर्ष २०२३ मध्ये दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यातील जनावरांसाठी चारा आगार चालू करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

‘शालेय शिक्षणासाठी साहाय्य’ या उपक्रमाचे ‘श्री कसबा गणपति विद्यार्थी दत्तक योजने’च्या अंतर्गत यशस्वी आयोजन !

प्रतिवर्षी मंडळाच्या वतीने गरीब मुलांना आर्थिकरित्या दत्तक घेतले जाते. महिलांच्या सबलीकरणासाठी हातभार लावला जातो.

धर्मकार्याचा अखंड ध्यास असलेले चेंबूर (मुंबई) येथील जगप्रसिद्ध प्रवचनकार भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) संतपदी विराजमान !

आजपर्यंत मी जी काही धर्म आणि ईश्वर यांच्याविषयी श्रद्धा जोपासली, त्यातील परमोच्च स्थान मिळाले, याचा मला आनंद आहे, तसेच मी भाग्यवान आहे. प्रत्यक्ष ईश्वराच्या अवताराने माझे कौतुक केले, हे माझे सौभाग्य आहे.

माऊलींचा रथ ओढण्याचा मान आळंदीच्या कुर्‍हाडे कुटुंबियांच्या बैलजोडीला !

माऊलींचा चांदीचा पालखी रथ ओढण्याचा मान आळंदीच्या कुर्‍हाडे कुटुंबियांच्या हौश्या आणि बाजी या बैलजोडीला मिळाला आहे.

चित्रकुट (मध्यप्रदेश) येथील वनवासी श्रीराममंदिराच्या पुजार्‍यांना ठार मारण्याची धमकी

मध्यप्रदेशात भाजपचे राज्य असतांना भूमाफियांकडून अशा प्रकारचे कृत्य केले जाते आणि पोलीस कारवाई करत नाहीत, हे हिंदूंना अपेक्षित नाही !