पुणे – विधानसभा निवडणुकीच्या वेळी नाकाबंदीमध्ये मुंबईहून पुण्यातील सराफ व्यावसायिकांना पाठवण्यात आलेली ४ कोटी १६ लाख रुपयांची ४ किलो ४७९ ग्रॅम चांदी, तसेच १ कोटी ५७ लाख रुपयांचे २ किलो ५११ ग्रॅम सोने असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी याविषयीची माहिती प्राप्तीकर विभाग, वस्तू आणि सेवा कर (जी.एस्.टी.) विभागातील अधिकार्यांना दिली आहे. ‘औंध येथील राजीव गांधी पुलावरून १६ नोव्हेंबर या दिवशी एक वाहन पुण्याकडे निघाले आहे’, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पडताळणीसाठी वाहन थांबवण्यात आले. या वेळी सोने आणि चांदी असा ऐवज सापडला. हस्तगत केलेल्या मुद्देमालाची नोंद चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात केली आहे.