अमित शहा गृह, तर राजनाथ सिंह यांचे संरक्षण खाते कायम !

केंद्रीय मंत्रीमंडळाचे खातेवाटप करण्यात आले आहे. भाजप सरकारच्या मागील कार्यकाळात प्रमुख खाती ज्यांच्याकडे होती त्यांना तिच खाती पुन्हा देण्यात आली आहेत.

पालखी सोहळ्याच्या मुख्य समन्वयकपदी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांची नियुक्ती !

जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारीचा पालखी सोहळा २९ आणि ३० जूनला पिंपरी-चिंचवड शहरातून जाणार आहे. पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांसाठी महापालिकेच्या वतीने विविध सेवा आणि सुविधा पुरवल्या जातात.

आरक्षण न दिल्यास विधानसभा निवडणुका लढणारच ! – मनोज जरांगे पाटील

मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या ‘आमरण उपोषणा’ला ८ जूनपासून प्रारंभ झाला. पोलिसांकडून या उपोषणाला अनुमती नाकारण्यात आली आहे; मात्र तरीही मनोज जरांगे हे उपोषणावर ठाम आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथे श्री मांगवीर बाबा देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा देण्याच्या मागणीसाठी ‘लहू प्रहार संघटने’ची निदर्शने !

जिल्ह्यातील शेंद्रा येथे असलेल्या श्री मांगवीर बाबा देवस्थानास तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा देण्यात यावा आणि श्री मांगवीर बाबा देवस्थान विकास प्राधिकरण स्थापन करण्यात यावे, या मागणीसाठी ‘लहू प्रहार संघटने’च्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय येथे ७ जून या दिवशी निदर्शने करण्यात आली.

श्रीमान योगी असलेल्या शिवरायांची साधना देशभक्तीची होती ! – भय्याजी जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

छत्रपती शिवाजी महाराज हे एकमात्र राजा होते, ज्यांना ‘श्रीमान योगी’ म्हटले जाते. त्यांची साधना देशभक्तीची होती, तर मातृभूमीची भक्ती त्यांनी केली. कर्मशील, विवेक, चारित्र्य अशा अनेक गुणांचा समुच्चय त्यांच्यामध्ये आढळतो

पालखी प्रस्थानदिनी देऊळवाड्यामध्ये ५६ दिंड्यांतील प्रत्येकी ९० वारकर्‍यांनाच प्रवेश !

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यादिनी देऊळवाड्यामध्ये गर्दी होऊ नये, यासाठी दिंड्यातील ठराविक वारकर्‍यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. ‘श्रीं’च्या रथापुढील २०, मागील २७ आणि ९ उपदिंड्या, अशा ५६ दिंड्यांतील प्रत्येकी ९० वारकर्‍यांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

संगीत उपासक गुरुवर्य उदयकुमार उपाध्ये यांचा अमृत महोत्सव सोहळा वसई (जिल्हा पालघर) येथे उत्साहात साजरा !

प.पू. (कै.) आबा उपाध्ये आणि प.पू. (कै.) (सौ.) मंगला उपाध्ये यांचे सुपुत्र अन् वसई येथील ‘समाज मंदिर ट्रस्ट’च्या संगीतवर्गाचे गुरुवर्य उदयकुमार उपाध्ये यांचा अमृत महोत्सव सोहळा येथील समाज मंदिर ट्रस्टच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.

माळेगाव (बारामती) येथे चारचाकीमध्ये अवैध गर्भलिंगनिदान करणार्‍या आधुनिक वैद्यासह दलालाला अटक !

माळेगावच्या गोफणेवस्ती येथे बांधकामाच्या ठिकाणी चारचाकीमध्ये ‘पोर्टेबल सोनोग्राफी मशीन’द्वारे गर्भलिंगनिदान सोनोग्राफी करणार्‍या डॉ. मधुकर शिंदे यांच्यासह बाळासाहेब घुले या दलालाला माळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

भाजपचे नेते समरजित घाटगे यांच्या पत्नीची बनावट ‘कस्टम’अधिकार्‍याकडून २० लाख रुपयांची फसवणूक !

मलेशियात पाठवलेल्या काही वस्तूंमध्ये अमली पदार्थ, तुमच्या नावाचे बनावट पारपत्र आणि ‘ए.टी.एम्. कार्ड’ आहे. हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. तरी तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले.

बावधन (पुणे) येथील ‘नॅन्सी ब्रह्मा सोसायटी’तील सदनिकाधारकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद !

कल्याणीनगर ‘पोर्शे’ कार अपघातातील अग्रवाल कुटुंबाचे आणखी एक प्रकरण उघडकीस