श्रीराम सेनेकडून महिलांना त्रिशूल दीक्षा !

धारवाड – महिलांमध्ये आत्मविश्‍वास वाढण्यासाठी श्रीराम सेनेकडून ९ जूनपासून येथील विद्यागिरीच्या सभागृहात त्रिशूल दीक्षा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,  अशी माहिती श्रीराम सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. गंगाधर कुलकर्णी यांनी दिली. श्री. कुलकर्णी म्हणाले की, ५० महिलांना त्रिशूल दीक्षा देण्यात येईल. या वेळी बीळगी मठाचे वचनश्री यांची वंदनीय उपस्थिती असेल. श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक आणि श्री. सचिन कुलकर्णी हे या वेळी मार्गदर्शन करणार आहेत.

प्रतिकात्मक चित्र

राज्य सरकार हिंदु महिलांना संरक्षण देत नाही. हिंदु महिलांच्या साहाय्यासाठी श्रीराम सेनेने साहाय्य दूरभाष (हेल्पलाईन) योजना प्रारंभ केली आहे, असेही त्यांनी सांगितले.