कायदा-सुव्यवस्थेच्या कारणावरून मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पोलिसांनी अनुमती नाकारली !

सगेसोयर्‍यांचा कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ८ जूनपासून पुन्हा एकदा ‘आमरण उपोषणा’ची घोषणा केली होती; मात्र त्यांच्या या उपोषणाला पोलिसांनी अनुमती नाकारली आहे.

सांगली येथील खासदार विशाल पाटील यांचा काँग्रेसला पाठिंबा !

येथील लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आलेले अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसला पाठिंबा देण्याचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे ६ जून या दिवशी सादर केले.

मद्यपान करून अपघात केल्याने कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचे निलंबन !

अशा पोलिसांवर निलंबनाऐवजी बडतर्फीची कठोर कारवाई करायला हवी !

खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयी मिरवणुकीत अज्ञातांकडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी !

विजयी मिरवणुकीमध्ये सोन्याच्या दागिन्यांची चोरी होणे, हे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे लक्षण!

कमकुवत पाया आणि सदोष संरचना यांमुळे फलक पडला !

आतातरी सर्वत्रच्या विज्ञापन फलकांची संरचनात्मक बांधणी केली आहे का ? हे महापालिकेने पडताळायला हवे !

डॉ. बापूजी साळुंखे अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध शिष्यवृत्ती योजना घोषित !

उच्च दर्जाचे अभियांत्रिकी शिक्षण विद्यार्थ्यांना अगदी माफक शुल्कामध्ये उपलब्ध व्हावे, असा उद्देश या शिष्यवृत्तीच्या निर्मितीमागे आहे,

कल्याण येथील शिवसेना शहरप्रमुखांना धमकी देणारा अटकेत !

कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्यानेच असे प्रकार घडतात ! अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

शाळा चालू होण्यापूर्वी राज्यातील ४४ लाख ६० सहस्र विद्यार्थ्यांना मिळणार विनामूल्य गणवेश !

मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पँट, तसेच मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट असे स्वरूप असेल.

शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी घेतले पू. भिडेगुरुजी यांचे आशीर्वाद !

या प्रसंगी पू. भिडेगुरुजी यांनी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी धारकरी श्री. राजू पुजारी, श्री. नितीन काळे यांसह अन्य उपस्थित होते.

कोल्हापूर मतदारसंघात २१ जणांची, तर हातकणंगले मतदारसंघात २५ जणांची अनामत रक्कम जप्त ! – अमोल येडगे, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात २४ उमेदवार उभे होते, त्यापैकी २१ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. ही रक्कम ४ लाख ३७ सहस्र ५०० रुपये इतकी आहे.